‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ची ‘समर युथ समिट’ उद्यापासून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

नागपूर - करिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध होत असताना, यशाच्या वाटा शोधणाऱ्या तरुणांसाठी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व्यासपीठाने उपलब्ध करून दिली आहे. युवकांसाठी ‘यिन’ करत असलेल्या उपक्रमांचा भाग म्हणून होणाऱ्या तीन दिवसांच्या ‘यिन समर युथ समिट २०१७’मध्ये उद्योग, राजकारण, डिजिटल ऑनलाइन मार्केटिंग, टीम बिल्डिंग, शेअर मार्केट, स्टार्टअप, खेळ, नवीन तंत्रज्ञान आदी विषयांवर चर्चा होणार आहेत.

नागपूर - करिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध होत असताना, यशाच्या वाटा शोधणाऱ्या तरुणांसाठी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व्यासपीठाने उपलब्ध करून दिली आहे. युवकांसाठी ‘यिन’ करत असलेल्या उपक्रमांचा भाग म्हणून होणाऱ्या तीन दिवसांच्या ‘यिन समर युथ समिट २०१७’मध्ये उद्योग, राजकारण, डिजिटल ऑनलाइन मार्केटिंग, टीम बिल्डिंग, शेअर मार्केट, स्टार्टअप, खेळ, नवीन तंत्रज्ञान आदी विषयांवर चर्चा होणार आहेत.

दरम्यान, स्पेक्‍ट्रम अकेडमी प्रस्तुत आणि नीलया ग्रुप ऑफ एज्युकेशन पॉवर्ड बाय असणाऱ्या या शिबिरासाठी सीड इन्फोटेक व सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन यांचे सहप्रायोजकत्व मिळाले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ही समिट होणार आहे. या समिटसाठी जी. एच. रायसोनी विद्यापीठ यांचे सहकार्य लाभले आहे.  

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गुरुनानक भवनात होणाऱ्या या ‘समिट’चे उद्‌घाटन गुरुवारी (ता. एक) सकाळी साडेदहाला होणार आहे. उद्‌घाटन सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, जी. एच. रायसोनी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. कमल सिंग, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. केशव वाळके तसेच ‘यिन’चे मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी उपस्थित असतील. तीन दिवसांत होणाऱ्या विविध सत्रांमध्ये नीलया ग्रुपचे संस्थापक नीलय मेहता आणि सुनील पाटील आदी नामवंत सहभागी होणार आहेत. तसेच, देश-विदेशांतील अन्य तज्ज्ञही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

पदवीचे शिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील तरुणांना उन्हाळ्याच्या सुटीचा सदुपयोग करत शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी ‘समर युथ समिट’ मोलाची भूमिका बजावणार आहे. गेली दोन वर्षे ‘यिन’ ही शिबिरे आयोजित करीत आहे. शिबिर सलग तीन दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत तीन सत्रांत होईल.

समिटमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी बुधवारी (ता. ३१) सायंकाळी सहापर्यंत ‘सकाळ’च्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा. या समिटसाठी ‘यिन’ सदस्यांसाठी प्रत्येकी रुपये २०० रुपये तर सदस्येतरांसाठी प्रत्येकी रुपये ४०० शुल्क आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची भोजन व्यवस्था केली जाणार आहे. आवश्‍यकतेप्रमाणे निवासाची व्यवस्थाही केली जाईल. तसेच, सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. मर्यादित जागा असल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर नोंदणी केली जाईल.

मान्यवर मार्गदर्शक
जयसिंग चव्हाण, व्यवस्थापकीय संचालक, रंजना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज
सुमित उरकुडकर, प्रेरणादायी वक्ता
सुनील पाटील, संस्थापक संचालक, स्पेक्‍ट्रम अकेडमी, नाशिक
शिवानी दाणी, संचालक, मनी बी इन्स्टिट्यूट, नागपूर
डॉ. प्रशांत कडू, अध्यक्ष, विदर्भ युथ ऑर्गनायजेशन
संदीप जोशी, नगरसेवक तथा युवानेता
अश्विन मुद्‌गल, आयुक्त, नागपूर महानगरपालिका
नीलय मेहता, संस्थापक संचालक, नीलया ग्रुप ऑफ एज्युकेशन
डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर
प्रा. विजय राठोड, सदस्य, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, महाराष्ट्र
स्वच्छंद चव्हाण, आय. आर. एस.
पुरणचंद्र मेश्राम, कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
डॉ. बबनराव तायवाडे, अध्यक्ष, प्राचार्य फोरम, महाराष्ट्र     

‘यिन समर युथ समिट २०१७’

केव्हा - गुरुवार (ता. एक) ते शनिवार (ता. तीन) सकाळी ९ ते सायंकाळी ५
यांच्या सहकार्याने :  राष्ट्रीय सेवा योजना आणि जी. एच. रायसोनी विद्यापीठ.
अधिक माहितीसाठी संपर्क :  बाळू राठोड : मो. ९८८१३२३५४३

विदर्भ

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - वाढत्या तापमानामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे चित्र होते.  परंतु, बदलत्या वातावरणातही स्वाइन फ्लूचा...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पदव्युत्तर शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून,...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017