‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ची ‘समर युथ समिट’ आजपासून

‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ची ‘समर युथ समिट’ आजपासून

नागपूर - करिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध होत असताना, यशाच्या वाटा शोधणाऱ्या तरुणांसाठी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व्यासपीठाने उपलब्ध करून दिली आहे. युवकांसाठी ‘यिन’ करत असलेल्या उपक्रमांचा भाग म्हणून होणाऱ्या तीन दिवसांच्या ‘यिन समर युथ समिट २०१७’मध्ये उद्योग, राजकारण, डिजिटल ऑनलाइन मार्केटिंग, टीम बिल्डिंग, शेअर मार्केट, स्टार्टअप, खेळ, नवीन तंत्रज्ञान आदी विषयांवर चर्चा होणार आहेत.

स्पेक्ट्रम ॲकेडमी प्रस्तुत ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ आयोजित, ‘समर युथ समीट २०१७’ निलया ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट द्वारा समर्थित ‘सीड इन्फोटेक’ आणि ‘सूर्यदत्ता ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट’ यांच्या सहकार्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ही समिट होणार आहे. या समिटसाठी जी. एच. रायसोनी विद्यापीठ यांचे सहकार्य लाभले आहे.  

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गुरुनानक भवनात होणाऱ्या या ‘समिट’चे उद्‌घाटन गुरुवारी (ता. एक) सकाळी साडेदहाला होणार आहे. उद्‌घाटन सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, जी. एच. रायसोनी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. कमल सिंग, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. केशव वाळके तसेच ‘यिन’चे मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी उपस्थित असतील. तीन दिवसांत होणाऱ्या विविध सत्रांमध्ये नीलया ग्रुपचे संस्थापक नीलय मेहता आणि सुनील पाटील आदी नामवंत सहभागी होणार आहेत. तसेच, देश-विदेशांतील अन्य तज्ज्ञही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पदवीचे शिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील तरुणांना उन्हाळ्याच्या सुटीचा सदुपयोग करत शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी ‘समर युथ समिट’ मोलाची भूमिका बजावणार आहे. गेली दोन वर्षे ‘यिन’ ही शिबिरे आयोजित करीत आहे. शिबिर सलग तीन दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत तीन सत्रांत होईल.

या समिटसाठी ‘यिन’ सदस्यांसाठी प्रत्येकी रुपये २०० रुपये तर सदस्येतरांसाठी प्रत्येकी रुपये ४०० शुल्क आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची भोजन व्यवस्था केली जाणार आहे. आवश्‍यकतेप्रमाणे निवासाची व्यवस्थाही केली जाईल. तसेच, सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. मर्यादित जागा असल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर नोंदणी केली जाईल.

या समिटसाठी ‘यिन’ सदस्यांसाठी प्रत्येकी रुपये २०० रुपये तर सदस्येतरांसाठी प्रत्येकी रुपये ४०० शुल्क आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची भोजन व्यवस्था केली जाणार आहे. आवश्‍यकतेप्रमाणे निवासाची व्यवस्थाही केली जाईल. तसेच, सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. मर्यादित जागा असल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर नोंदणी केली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com