‘युग’प्रकरणी २० ला निर्णयाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

नागपूर - बहुचर्चित अशा युग चांडक अपहरण आणि हत्या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीविरुद्धची सुनावणी पूर्ण झालेली असून २० जुलै रोजी त्यावर निर्णय लागण्याची शक्‍यता आहे. या प्रकरणातील इतर दोन आरोपींना यापूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून ती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेदेखील कायम ठेवली आहे. राजेश धनालाल दवारे (२०) आणि अरविंद अभिलाष सिंग (२४) अशी आरोपींची नावे  आहेत. त्यांनी १ सप्टेंबर २०१४ रोजी युग चांडक या आठ वर्षीय चिमुरड्याचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केली होती. अपहरणकर्त्यांकडून दोन वेळा खंडणीसाठी फोन करण्यात आले होते.

नागपूर - बहुचर्चित अशा युग चांडक अपहरण आणि हत्या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीविरुद्धची सुनावणी पूर्ण झालेली असून २० जुलै रोजी त्यावर निर्णय लागण्याची शक्‍यता आहे. या प्रकरणातील इतर दोन आरोपींना यापूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून ती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेदेखील कायम ठेवली आहे. राजेश धनालाल दवारे (२०) आणि अरविंद अभिलाष सिंग (२४) अशी आरोपींची नावे  आहेत. त्यांनी १ सप्टेंबर २०१४ रोजी युग चांडक या आठ वर्षीय चिमुरड्याचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केली होती. अपहरणकर्त्यांकडून दोन वेळा खंडणीसाठी फोन करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी दहेगाव-पाटणसावंगी दरम्यानच्या लोणखैरी येथील नाल्यात युगचा गळा दाबून निर्घृण खून केला होता. २ सप्टेंबर रोजी युगचा मृतदेह मिळाला होता. खंडणीच्या उद्देशाने त्यांनी हे अपहरण केले होते. लकडगंज पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सबळ पुराव्यांसह आरोपींविरुद्ध २९० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. 

सरकारी पक्षाने ५० साक्षीदार तपासले. उल्लेखनीय बाब म्हणजे एकही साक्षीदार फितूर (होस्टाईल) झाला नव्हता. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपींना दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली होती. तसेच हायकोर्टात ही शिक्षा कायम ठेवण्यात आली होती. अल्पवयीन आरोपीविरुद्ध बाल न्यायालयाच्या न्यायाधीश बेदरकर यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे.