बहादुरा ग्रामपंचायतीचा रेकॉर्ड जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

नागपूर - प्रत्यक्षात नागरिकांना अनेक समस्या भेडसावत असल्यातरी कागदावर मात्र सर्व काही ‘आल बेल’ असल्याचे अधिकाऱ्यांकडून दाखविण्यात येते. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी प्रत्यक्ष ग्रामपंचायतीला औपचारिक भेट देऊन कागदपत्रांची तपासणी करून नागरिकांची प्रत्यक्ष संवाद साधण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यांनी बहादुरा ग्रामपंचायतील भेट दिली. या वेळी त्यांना ग्रामपंचायतीचा रेकॉर्ड योग्य नसल्याचे दिसून आल्याने तो जप्त करीत चौकशीचे आदेश दिले. 

यापूर्वी त्यांनी कोटाले येथील लिंगा ग्रामपंचायतील भेट दिली होती. चौकशीत आर्थिक गैरव्यवहार असल्याचे समोर आल्यानंतर ग्राम सचिवाला निलंबित केले होते. तसेच सरपंचावरही कार्यवाही करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठविला होता. त्यामुळे त्यांच्या भेटीने ग्रामसचिवांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

सीईओ बलकवडे यांनी शनिवारला दुपारच्या सुमारास नागपूर ग्रामीण तालुक्‍यातील बहादुरा ग्रामपंचायतीला भेट दिली. त्यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी केली. आवाक-जावक आणि कर वसुलीबाबतही माहिती घेतली. मात्र, ग्रामसचिवास योग्य माहिती देता आली नाही. रेकॉर्डमध्ये अनेक विषयाच्या नोंदीही नव्हत्या. कराची माहिती जुळत नसल्याचे दिसून आले. त्यांनी सर्व रेकॉर्ड जप्त करण्याचे आदेश दिले. तसेच गटविकास अधिकारी यांना कागदपत्रांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. कर्मचाऱ्यांकडून आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येते. 

शिक्षणाचा दर्जाही कमी
सीईओ बलकवडे यांनी येथील शाळेलाही भेट दिली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची चाचणी घेतली. यावर त्यांनी असमाधान व्यक्त करीत शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेट देण्याचे निर्देश दिले.  त्यामुळे शिक्षकांवर कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहे.

Web Title: nagpur news zp grampanchayat