तापमानाने नोंदला मोसमातील उच्चांक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

नागपूर - विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला असून, उपराजधानीत पाऱ्याने गुरुवारी अचानक विक्रमी उडी घेत नवा उच्चांक गाठला. विदर्भ व मध्य भारतात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे 41 अंश इतकी करण्यात आली. करण्यात आली. उन्हाची लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचे संकेत प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आले. 

एप्रिल महिना उंबरठ्यावर असल्याने विदर्भात आता हळूहळू ऊन वाढेल, अशी अपेक्षा होती. त्याचा प्रत्यय गुरुवारी आला. कमाल तापमानात सरासरी तीन अंशांनी वाढ होऊन 40.6 अंशांवर गेले. पाऱ्याने केवळ या मोसमातीलच उच्चांक गाठला नाही, तर मार्च महिन्यातीलही नव्या विक्रमाचीही नोंद झाली. यापूर्वीचा मार्चमधील तापमानाचा विक्रम 40.1 अंश सेल्सिअस इतका होता. अकोल्यातही सरासरी तापमान तीन अंशांनी वाढले. येथे पाऱ्याने या मोसमातील 41.0 अंश सेल्सिअसचा नवा उच्चांक गाठला. विदर्भातील इतरही शहरांमध्ये उन्हाची लाट दिसून येत आहे. वर्धा (40.5 अंश सेल्सिअस), चंद्रपूर (40.0 अंश सेल्सिअस), अमरावती (39.6 अंश सेल्सिअस), गोंदिया (39.2 अंश सेल्सिअस), यवतमाळ (39.0 अंश सेल्सिअस), बुलडाणा (38.6 अंश सेल्सिअस) या ठिकाणी पाऱ्यात सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशांनी वाढ झाली. 

दुपारच्या सुमारास उन्हाचे चटके अधिकच तीव्रतेने जाणवत होते. ज्येष्ठांसोबतच तरुणांनाही अस्वस्थ करणारे ऊन होते. उन्हाची तीव्रता लक्षात घेता कुलरही हळूहळू बाहेर पडताहेत. वातावरणातील बदलामुळे आजार डोके वर काढण्याची शक्‍यता असल्याने उन्हामध्ये विशेषत: दुपारी घराबाहेर पडू नये, असा डॉक्‍टरांचा नागपूरकरांना सल्ला आहे. 

Web Title: Nagpur temperature @ 40