जंगल सफारी आरक्षणाचा श्रीगणेशा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

चार महिन्यांअगोदरच सर्वच व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यांत सफारी बुकिंगची सुविधा 
नागपूर - राज्यातील ताडोबा-अंधारीसह सर्वच व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यातील जंगल सफारीचे ऑनलाइन बुकिंग शनिवारपासून सुरू झाले. पर्यटक हंगाम १५ ऑक्‍टोबरपासून सुरू होणार असल्याने चार महिने अगोदरच बुकिंगचा शुभारंभ केला. पूर्वी ही बुकिंग रात्री १२ वाजता सुरू होत होती. आता सकाळी आठ वाजतापासून सफारीचे ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे. इतर राज्यांतील आणि विशेषत: विदेशी पर्यटकांना बऱ्याच आधीपासून या दौऱ्याची आखणी करता यावी यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.

वन्यजिवांची विविधता व त्यांच्या सहज दर्शनासाठी पर्यटक ताडोबा-अंधारी, पेंच, बोर, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, सह्यांद्री व्याघ्र प्रकल्प तसेच राज्यातील टिपेश्‍वर, उमरेड-कऱ्हांडला, मानसिंगदेव, राधानगरी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह ४७ अभयारण्यांत पर्यटकांची गर्दी वाढते आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सोयीसाठी बुकिंगची सुविधा सुरू केलेली आहे. मागील चार वर्षांपासून प्रति व्यवहार ३५ रुपये सेवा शुल्क आकारण्यात येत होते. त्यात यंदा १५ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याने सेवा शुल्कासाठी ५० रुपये आकारण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यटन थोडे महागले आहे. 
अभयारण्ये आणि प्रकल्पात गवे, सांबर, चितळ, वाघ, बिबट, रानकुत्री, फुलपाखरे, नानाविध पक्षी, निरनिराळ्या वनस्पती आहेत. निसर्ग पर्यटन शास्त्रीय आधारावर व्हावे आणि पर्यटनाचा वन्यजीव व त्यांच्या अधिवासावर प्रतिकूल परिणाम होऊ नये हे लक्षात घेऊनच पर्यटनाचा आराखडा तयार करण्यात येतो. जंगल सफारीचे ऑनलाइन बुकिंग वेब पोर्टलवरून १२० दिवस आधीच करण्याची सोय पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आलेली होती. 

पावसाळ्यामुळे यंदा प्रथमच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासह पेंच व्याघ्र प्रकल्प राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सूचनेनुसार पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलेले आहे. १५ ऑक्‍टोबरला पर्यटकांसाठी उघडणार असल्याने चार महिन्यांअगोदरच बुकिंग सुरू करण्यात आले आहे.

विदर्भ

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - वाढत्या तापमानामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे चित्र होते.  परंतु, बदलत्या वातावरणातही स्वाइन फ्लूचा...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पदव्युत्तर शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून,...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017