स्वाइन फ्लूने घेतला तीन जणांचा बळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - वाढत्या तापमानामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे चित्र होते.  परंतु, बदलत्या वातावरणातही स्वाइन फ्लूचा विषाणू तग धरून आहे. स्वाइन फ्लू बाधितांचे मृत्युसत्रात प्रचंड वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसांत विविध रुग्णालयांत तिघे दगावले आहेत. विशेष असे की, पुढे नवरात्रोत्सव आणि दसरा आहेत. स्वाइन फ्लूचे सावट या उत्सवावर पसरले आहे.  

स्वाइन फ्लूच्या बाधेने दगावलेले तिन्ही रुग्ण पस्तीशीतील असून नागपूर क्रिटिकेअर, मेयो तसेच वोक्‍हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू पावले आहेत. स्वाइन फ्लूने होणारे मृत्यू थांबत नसल्यानंतर महापालिकेचा आरोग्य विभागाने जनजागरण करण्याची केवळ घोषणा केली आहे. उपचारात मात्र अद्याप महापालिका प्रशासन ढिम्म आहे. १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान २२ जणांना लागण झाली असून यातील तिघे दगावले आहेत. स्वाइन फ्लूने होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ झाल्याने आरोग्य विभागाची यंत्रणा हादरली आहे. 

नागपूर विभागात स्वाइन फ्लूने दगावलेल्या व्यक्तींची संख्या ६३ वर पोहोचली आहे. तर, स्वाइन फ्लूबाधितांचा आकडा ३२६ वर पोहोचला आहे. दगावलेल्या रुग्णांमध्ये ३० रुग्ण शहरातील असल्याची नोंद आरोग्य विभागात आहे.