वृक्षलागवडीसाठी ४,५०० हेक्‍टर जागा निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

वृत्तात ३३२ ठिकाणांची नोंद - १३ कोटी वृक्षलागवडीचे सुधारित लक्ष्य 
नागपूर - राज्यात वनविभागाने ५० कोटी वृक्षलागवडीकरिता अंतिम जागा निश्‍चिती व त्याची संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत वनविभागाच्या ५ लाख वृक्ष लागवडीसाठी ३३२ ठिकाणी ४,५०० हेक्‍टर जागा निश्‍चित झाल्यात. १० सप्टेंबर २०१७ पर्यंत उद्दिष्टानुसार संपूर्ण माहिती वनविभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करता येणार आहे.   

सिव्हिल लाइन्समधील वनभवनात प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री. भगवान यांनी बैठक घेतली. त्यात २०१८ मध्ये १३ कोटी वृक्षलागवड कार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. दरम्यान, राज्यातील वनवृत्तांना वृक्षलागवडीचे नवीन सुधारित लक्ष्य देण्यात आले. यावेळी अपर मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर, प्रवीण श्रीवास्तव, डॉ. दिलीप सिंग उपस्थित होते. वनविभागाच्या पुढाकाराने मेगा वृक्षारोपण कार्यक्रम पुढील वर्षी राबविण्यात येणार आहे. 

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या सूचनांनुसार राज्य शासनाने २०१९ पर्यंत ५० कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. यावर्षी चार कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य साध्य झाले आहे. येत्या वर्षात १३ कोटी वृक्ष लागवडीच्या महत्त्वाच्या कार्यक्रमात घेतला आहे. त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. 

राज्यातील सर्वच वनवृत्तात पाच कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. सामाजिक वनीकरण विभाग एक कोटी व महाराष्ट्र वनविकास महामंडळासाठी १ कोटी ५० लाख असे एकूण ७ कोटी ५० लाख वृक्ष लागवडीचे नवीन उद्दिष्ट आहे.

वृक्षलागवडीचे उद्दिष्ट
अमरावती    १२ लाख ५० हजार
औरंगाबाद    ८२ लाख ५० हजार 
चंद्रपूर    २७ लाख ५० हजार
गडचिरोली    २७ लाख ५० हजार
कोल्हापूर    ४७ लाख ५० हजार
नागपूर    ४० लाख 
नाशिक    ५५ लाख
यवतमाळ    ३५ लाख

Web Title: nagpur vidarbha news 4500 hector place final for tree plantation