पन्नास हजार शेतकरी कर्जमाफीस ठरणार पात्र

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

सरकारची घोषणा - शेतकऱ्यांचे लक्ष बॅंकांकडे

नागपूर - शेतकरी आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने ३४ हजार कोटींच्या ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा शनिवारी (ता. २४) केली. ३० जून २०१६ पर्यंत शेतकऱ्यांकडे थकीत असलेल्या कर्जापैकी सरसकट दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. याला नागपूर जिल्ह्यातील ५० हजार शेतकरी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे कर्जमाफीवरून सुरू असलेल्या विविध चर्चांना अखेर विराम मिळाला.

नागपूर जिल्ह्यातील १५ हजार ७६६ शेतकऱ्यांचे ५० हजारांपर्यंचे, ६ हजार ६६५ शेतकऱ्यांचे एक लाखपर्यंतचे आणि ११ हजार शेतकऱ्यांकडे एक लाखाच्या वर कर्ज आहे. नियमित कर्जफेड करणारे ५ हजार, तर कर्जाचे पुनर्गठन केलेले ११ हजार शेतकरी आहेत. यापैकी २२ हजार शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा होणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्याला २५ टक्के अनुदान व पीक कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या नजरा सातबाऱ्यावरून कर्जाचा बोजा कमी होण्याकडे लागल्या आहेत.

विभागातील चार लाखांवर शेतकऱ्यांना लाभ
राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेचा नागपूर विभागातील चार लाखांवर शेतकऱ्यांना लाभ होण्याची शक्‍यता बॅंकेच्या सूत्राने दिली. सोमवारपासून राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बॅंकेचे अधिकारी व कर्मचारी कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू करणार असल्याची माहिती आहे.