रिझर्व्ह बॅंकेसमोर राष्ट्रवादीकडून प्रतीकात्मक होळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

नागपूर - भाजप-शिवसेनेच्या नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांसोबत सर्वसामान्य माणूस आर्थिक संकटात सापडला आहे. या निर्णयाविरूद्ध बुधवारी (ता. ८) संविधान चौकातील रिझर्व्ह बॅंकेच्या गेटसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी  एक लाखाच्या नोटांची प्रतीकात्मक होळी करून आंदोलन केले.

नागपूर - भाजप-शिवसेनेच्या नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांसोबत सर्वसामान्य माणूस आर्थिक संकटात सापडला आहे. या निर्णयाविरूद्ध बुधवारी (ता. ८) संविधान चौकातील रिझर्व्ह बॅंकेच्या गेटसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी  एक लाखाच्या नोटांची प्रतीकात्मक होळी करून आंदोलन केले.

नोटाबदलीसाठी बॅंकांपुढे रांगेत उभे राहिल्याने देशात २०० च्यावर नागरिकांचा बळी गेला आहे. काळा पैसा मोठ्या प्रमाणात बाहेर काढला जाईल, जनधन योजनेमध्ये सामान्य माणसाला मदत केली जाईल, बेरोजगारांसाठी रोजगार निर्माण केले जातील, असे अनेक फसवी आश्‍वासने  जनतेला भाजप सरकारने दिले. प्रत्यक्षात जनतेची फक्त फसवणूकच झाली असून, महागाई प्रचंड वाढली आहे. शेतकरी, शेतमजूर उद्‌ध्वस्त झाला आहे.

व्यापार मंदावला आहे, उद्योगधंदे थांबले. याला भाजपचा चुकीचा नोटाबंदीचा निर्णय कारणीभूत असल्याचा आरोप आमदार प्रकाश गजभिये यांनी केला. सरकारने देशाला आर्थिक दिवाळखोरीकडे ढकलेले आहे, अशी टीकाही त्यांनी  केली. या वेळी ९९ टक्के नोटा बॅंकेत जमा झाल्याचा दावा सरकार करीत असले तरी परदेशी चलनातील नोटा अजूनही भारताच्या तिजोरीत जमा झाल्या नाहीत, १ टक्का जुन्या नोटा अजूनही नेपाळ आदी देशांतील बॅंकामध्ये चलनात आहेत, त्या भारताच्या तिजोरीत जमा झाल्या नाहीत. नोटबंदीमुळे देशात महाघोटाळा झाला आहे. भारताचा विकासदर साडेसात टक्‍क्‍याहून साडेपाच टक्‍क्‍यांवर येणे, हे नोटाबंदीमुळे झाले असून सरकारचे अपयश दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी एक लाखाच्या नोटांची प्रतीकात्मक होळी करून निषेध व्यक्त केला. आंदोलनात कवळूजी मुळेवार, रितेश मुळेवार, प्रकाश सोमकुंवर, भूपेंद्र सनेश्वर, विजय गजभिये, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, अजय मेश्राम, अजय टांक, अविनाश तिरपुडे, संदीप मेंढे, रूद्र ढोकडे, प्रवीण बावने, पंकज बोंद्र, गणेश मौदेकर, गौतम सोमकुंवर, देवेंद्र धर्मे, अमरसिंग सिकरवार, धनराज वाहणे, कृष्णराव कोचे, सतिश बागडे, रंजना नांदगावे, निर्मला शाहू, वंदना टेंभरे, रामा आसरे, जितेंद्र बागडे, सुरेश कोहळे, अमित मुळेवार, सतीश चव्हाण, सत्यम गुप्ता, शकुंतला पाटील, पारूबाई बनाफर, हरीश माकोडे, राजेश गुप्ता, मोरेश्वर ढोले, दिनेश अग्ने, सचिन पोकळे, बंडू वाहने, रामराव शिंदेसह होते.