अनधिकृत भूखंड खरेदी-विक्रीवर बंदी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

स्मार्ट सिटी एसपीव्हीच्या बैठकीत सतराशे एकरांवर निर्णय - मानव संसाधन धोरणालाही मंजुरी
नागपूर - स्मार्ट सिटीअंतर्गत एरिया बेस्ड्‌ डेव्हलमपेंटच्या १,७३० एकर परिसरातील अनधिकृत ले-आउट व भूखंडांच्या खरेदी-विक्रीवर संपूर्णपणे बंदी लावण्याचा निर्णय स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एनएसएसडीसीएल) बैठकीत घेण्यात आला. याशिवास मानव संसाधन धोरणालाही मंजुरी देण्यात आली असून, असे धोरण तयार करणारी नागपूर स्मार्ट सिटीची एसपीव्ही देशात पहिली ठरली. 

स्मार्ट सिटी एसपीव्हीच्या बैठकीत सतराशे एकरांवर निर्णय - मानव संसाधन धोरणालाही मंजुरी
नागपूर - स्मार्ट सिटीअंतर्गत एरिया बेस्ड्‌ डेव्हलमपेंटच्या १,७३० एकर परिसरातील अनधिकृत ले-आउट व भूखंडांच्या खरेदी-विक्रीवर संपूर्णपणे बंदी लावण्याचा निर्णय स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एनएसएसडीसीएल) बैठकीत घेण्यात आला. याशिवास मानव संसाधन धोरणालाही मंजुरी देण्यात आली असून, असे धोरण तयार करणारी नागपूर स्मार्ट सिटीची एसपीव्ही देशात पहिली ठरली. 

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी होते. एकूण बारा विषयांवर चर्चा झाली. स्मार्ट सिटी एरिया बेस्ड्‌ डेव्हलपमेंटअंतर्गत भरतवाडा, पारडी, पुनापूर व भांडेवाडीत टाउन प्लानिंगनुसार कामांना वेग आला आहे. विकासासाठी या एकूण १,७३० एकर भागांतील अनधिकृत भूखंड तसेच ले-आउटच्या खरेदी-विक्रीवर बंदी लावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी सांगितले. या परिसरातील नो डेव्हलपमेंट झोन तसेच शेतीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात ले-आउट व अनधिकृत भूखंड आहेत. 

टाउन प्लॅनिंगनुसार या भागाचा विकास आराखडा अहमदाबाद येथील एचसीपी डिझाइन, प्लॅनिंग ॲण्ड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तयार करीत आहे. या भागातील काही भूखंडधारक भूखंड खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिले होते. संपूर्ण खसरा क्रमांकाच्या खरेदी-विक्रीवर बंधने नाहीत. 

परंतु, त्याचे तुकडे करून खरेदी-विक्रीवर बंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले. अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेसी यांनीही या परिसरात अनधिकृत भूखंड खरेदी-विक्री बंद केल्याबाबत जनजागृती करण्याचे निर्देश मनपा आयुक्त अश्‍विन मुदगल यांना दिले. बैठकीत एसपीव्ही संचालक महापौर नंदा जिचकार, स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आमदार कृष्णा खोपडे, पोलिस आयुक्त के. व्यंकटेश, मनपा आयुक्त अश्‍विन मुदगल, नासुप्र सभापती डॉ. दीपक म्हैसेकर होते. बैठकीत एचसीपी कंपनीने टाउन प्लानिंगनुसार विकास आराखड्याचे सादरीकरण केले. ग्रॅंट थॉर्नटंट इंडिया कंपनीच्या प्रतिनिधींनी एरिया बेस्ड्‌ डेव्हलपमेंट भागातील कामाची माहिती दिली.

आमदार खोपडेंनी घेतली भेट 
पूर्व नागपुरातील आमदार कृष्णा खोपडे यांनी काही नगरसेवकांसोबत अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेसी यांची भेट घेऊन एरिया बेस्ड्‌ डेव्हलपमेंटमध्ये ४९० एकर जागेचा समावेश करण्याची मागणी केली. मात्र, सुरुवातीला ९५१ एकर जागेचाच प्रस्ताव असलेल्या एरिया बेस्ड्‌ डेव्हलपमेंटमध्ये आता एकूण १,७३० एकर जागेचा समावेश असल्याचे नमूद करीत त्यांचे समाधान करण्यात आले.

एसपीव्हीत ५४ अधिकारी, कर्मचारी
एसपीव्हीच्या मानव संसाधन धोरणालाही मंजुरी देण्यात आली. एसपीव्हीत ५४ अधिकारी, कर्मचारी राहतील. कर्मचारी, अधिकाऱ्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे. दुसऱ्या वर्षी नियुक्ती कायम ठेवण्यासाठी कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या पहिल्या वर्षातील कामगिरीचा विचार केला जाणार आहे. दर सहा महिन्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन होणार आहे.

विदर्भ

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - वाढत्या तापमानामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे चित्र होते.  परंतु, बदलत्या वातावरणातही स्वाइन फ्लूचा...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पदव्युत्तर शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून,...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017