महिनाभराने सापडला बायोमेट्रिकला मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

लेटलतीफ कर्मचाऱ्यांना शिस्त लावणार - अध्यक्ष, सीईओंचा दावा
नागपूर - जिल्हा परिषदेतील सर्वच विभागात बायोमेट्रिक मशीन लावण्यात जिल्हा परिषद प्रशासनाला महिनाभरानंतर मंगळवारी (ता. २७) मुहूर्त सापडला. जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांनी बायोमेट्रिक मशीनचे उद्‌घाटन केले. यामुळे लेटलतीफ कर्मचाऱ्यांना शिस्त  लागणार असल्याचा दावा अध्यक्षांनी केला.

जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांची हजेरी पूर्वी रजिस्टरवर केली जात होती. त्यामुळे कर्मचारी उशिरा आले तरी ते वेळेत आल्याची नोंद करीत होते. बरेच कर्मचारी दोन ते तीन उशिरा येत होते. परिणामी जिल्हा परिषदेत कामासाठी येणाऱ्या नागरिकांना फटका बसत होता. विभाग प्रमुखांचेदेखील याकडे लक्ष नव्हते. अलीकडे यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यासंबंधीच्या तक्रारीत वाढ झाली. कर्मचाऱ्यांच्या लेटलतीफ येण्याचा फटका पदाधिकारी व सदस्यांना बसल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने याची गांर्भीयाने दखल घेतली.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागात बायोमेट्रिक मशीन लावण्याचे निर्देश दिले. त्यासाठी दोन लाख रुपये खर्चून २० बायोमेट्रिक मशीनची खरेदी केली. पंधरा ते वीस दिवसांपूर्वीच या मशीन विभागांमध्ये लावल्या. मात्र, उद्‌घाटनाचा मुहूर्त मंगळवारी सापडला. या वेळी सीईओ बलकवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, महिला बालकल्याण अधिकारी थोरात, समाजकल्याण अधिकारी तेलगोटे व अधिकारी होते.

उपाध्यक्ष अनभिज्ञ
बायोमेट्रिक मशीन उद्‌घाटनाला शिक्षण सभापती उकेश चव्हाण, कृषी सभापती आशा गायकवाड, महिला बालकल्याण सभापती पुष्पा वाघाडे व काही सदस्य उपस्थित होते. या वेळी उपाध्यक्ष  शरद डोणेकर जिल्हा परिषदेत दाखल झाले. त्यांनी कशाचा कार्यक्रम सुरू आहे अशी विचारणा केली. त्यांना याबाबत विचारले असता काहीच कल्पना नसल्याचे सांगितले.