कॅप्टन पारुळकर यांची यशोगाथा रुपेरी पडद्यावर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

‘द ग्रेट इंडियन एस्केप’ - आज चित्रपटाचे सादरीकरण, पाक सैन्याच्या तावडीतून पळण्याची ऐतिहासिक कामगिरी
नागपूर - नागपूरकर असलेले सेवानिवृत्त ग्रुप कॅप्टन दिलीप पारुळकर यांची यशोगाथा ‘द ग्रेट इंडियन एस्केप’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 

‘द ग्रेट इंडियन एस्केप’ - आज चित्रपटाचे सादरीकरण, पाक सैन्याच्या तावडीतून पळण्याची ऐतिहासिक कामगिरी
नागपूर - नागपूरकर असलेले सेवानिवृत्त ग्रुप कॅप्टन दिलीप पारुळकर यांची यशोगाथा ‘द ग्रेट इंडियन एस्केप’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 

१९७१ च्या युद्धात लाहोरमध्ये विमान कोसळल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने रावळपिंडीच्या छावणीत पारुळकरांना युद्धकैदी केले होते. पाकिस्तानी सैन्याच्या तावडीतून धाडसी पळ काढण्याची ऐतिहासिक कामगिरी दिलीप पारुळकर यांनी केली होती. युद्धात कैदी होऊन पळ काढणारे तत्कालीन फ्लाइट लेफ्टनंट पारुळकर यांच्यासह  हवाईदलातील आणखी दोन अधिकारी होते. सर्वसामान्यांना माहीत नसलेल्या या कामगिरीवरील या चित्रपटाचे विशेष सादरीकरण हवाईदलाच्या येथील मेंटेनन्स कमानमध्ये रविवारी होत आहे. यानिमित्ताने पारुळकर यांनी मेंटेनन्स कमान मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधला.

पारुळकर म्हणाले, युद्धात माझ्या विमानाला गोळ्या लागल्या होत्या. त्यानंतरही नऊ यशस्वी भरारी घेतल्या. मात्र, दहाव्या भरारीवेळी माझे विमान पाडण्यात आले. आपल्याला पोलिसांनी पकडून लष्कराकडे सोपवले. रावळपिंडीच्या छावणीत नेण्यात आले. आम्ही एकूण १२ वैमानिक होतो. तेथील हवाईदल अधिकारी स्क्वॉड्रन लीडर उस्मान हामिद विशेष आठवतो. त्याने कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही. तोपर्यंत आपण युद्धदेखील जिंकले होते. तरीही सरकारी स्तरावर वाट न पाहता पळ काढायचाच ठरवले. सोबतचे फ्लाइट लेफ्टनंट एम. एस. ग्रेवाल व फ्लाइट लेफ्टनंट हारीश सिंहजी यांनीही साथ दिली. दिवस ठरला आणि छावणीतून पळ काढला तो थेट अफगाणिस्तानच्या दिशेने. दुर्दैवाने अफगाणिस्तान सीमेआधी आम्हाला पुन्हा पकडण्यात आले, असे पारुळकर यांनी सांगितले. युद्धकैदी म्हणून पळ काढणे हा हवाईदलाच्या कर्तव्य आणि प्रशिक्षणाचाच एक भाग आहे. ही संपूर्ण घटना तीन-साडे तीन वर्षांच्या अथक संशोधनानंतर पडद्यावर आणण्याचा प्रयत्न करणारे दिग्दर्शक तरणजितसिंग नामधारी, निर्मात्या बंदना प्रीत कौर, वैमानिकांपैकी दोन वैमानिकांची भूमिका साकारणारे राजसिंग अरोरा व निमेश शिंदे यांच्यासह संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर समीर गंगाखेडकर तसेच अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

विदर्भ

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - वाढत्या तापमानामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे चित्र होते.  परंतु, बदलत्या वातावरणातही स्वाइन फ्लूचा...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पदव्युत्तर शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून,...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017