घराचे स्वप्न, दिवास्वप्न झाले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

नागपूर - गुडगाव, नोएडा, मुंबई, पुणे, बंगळूर, हैदराबाद, चेन्नई, कोलकता, अहमदाबाद आणि नागपूर या शहरांमधील घरांच्या विक्रीत सरासरी ४० टक्के आणि नव्या घरांच्या उपलब्धतेत ४९ टक्‍क्‍यांची घट झाल्याचा दावा एका अहवालाचा दाखला देत ग्रामीण बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुंदर रतन यांनी सांगितले. गेल्या एका वर्षात घरांच्या विक्रीत गेल्या वर्षाच्या तुलनेत २० टक्‍क्‍यांची घसरण नोंदविण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

मंदीमुळे अडचीत सापडलेल्या बांधकाम व्यवसायाचे नोटाबंदीने कंबरडे मोडल्याचे समोर आले आहे. नोटाबंदीने काळा पैसा बाहेर येणार असून, यात घरांच्या किमती कमी होऊ शकतात, या आशेने बहुतांश ग्राहकांनी घर खरेदीचा बेत पुढे ढकलला. त्याचबरोबर रोकड टंचाईचाही  खरेदीवर परिणाम झाला. 
वस्तू व सेवा करानंतर रेरा कायदा आल्याने गेल्या एका वर्षात घरांच्या विक्रीत सरासरी ४० टक्‍क्‍यांची घट झाली. 

देशातील प्रमुख शहरांमधील घर विक्रीला नोटाबंदीची झळ बसली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बड्या विकासकांनी सवलतींची खैरात केली. मात्र, घरांच्या किमती आणखी कमी होतील, असा अंदाज अनेक संस्थांनी वर्तवल्याने ग्राहकांनी वाट पाहण्याचा पवित्रा घेतला. परिणामी, मागणीत मोठी घसरण नोंदविण्यात आली. 

अहवाल काय सांगतो....
‘प्रॉपटायगर डॉटकॉम’ या संकेतस्थळाच्या अहवालानुसार जुलै ते ऑक्‍टोबर या कालावधीत  दरमहा सरासरी १९ हजार घरांची विक्री झाली आणि १८ हजार नवी घरे विक्रीसाठी उपलब्ध  झाली होती. मात्र, नोटाबंदी लागू झाल्यानंतर विक्रीमध्ये आणि नव्या घरांच्या उपलब्धेवर परिणाम झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.