धम्मदीक्षेचा आज वर्धापन दिन सोहळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्‍टोबर 1956 मध्ये दसऱ्याला नागवंशीयांच्या भूमीत कोट्यवधी अस्पृश्‍यांना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा धम्म दिला. त्या धम्मक्रांतीचा 61वा वर्धापन दिन सोहळा शनिवारी (ता.30) सायंकाळी सहा वाजता दीक्षाभूमीवर होणार आहे.

सोहळ्याला प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आदी उपस्थित राहतील. हा सोहळा भन्ते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

दरम्यान, सुरक्षेसाठी दीक्षाभूमीच्या चारही बाजूंना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असले, तरी पोलिसांतर्फे दीक्षाभूमीच्या चहूबाजूला 60 सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा संपर्क दीक्षाभूमीवर नियंत्रण कक्षाशी राहील.