आवाज नको डीजेवाल्या... तुला बाप्पाची शप्पथ हाय!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

ध्वनिप्रदूषण केल्यास होणार कडक कारवाई

नागपूर - आगामी गणेशोत्सवासाठी शहर पोलिसांनी कंबर कसली असून सुरक्षेच्या दृष्टीने व ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पावले टाकली आहेत. याचाच एक भाग म्हणून पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी नुकतीच सर्व गणेश मंडळांची एक बैठक घेतली. या वेळी पर्यावरणतज्ज्ञ व प्रेमी उपस्थित होते. त्यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून देत गणेशोत्सवादरम्यान होणारे ध्वनिप्रदूषण आणि जलप्रदूषण रोखण्याचे आवाहन केले.

बाजारात उपलब्ध असणारे उच्च तीव्रतेचे ध्वनिक्षेपक ध्वनिप्रदूषण करण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे अनेक गंभीर परिणाम होत आहेत. उच्च रक्तदाब, कायमचा बहिरेपणा तसेच म्हातारे व लहान मुलांना अधिक त्रास होऊन रुग्णालये, शाळा, महाविद्यालये यांनादेखील आवाजाचा फटका बसतो.

तसेच गणेशमूर्ती सर्रासपणे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनूवन केमिकलने रंगवल्या जातात. या मूर्ती जलाशयात टाकल्यानंतर पाणी दूषित होऊन जलजीव नष्ट होत आहेत. त्यामुळे जलप्रदूषण होत असल्याने मानवास अपायकारक ठरत आहे. जलाशयात असणारे अन्नपदार्थ मानवी सेवनात आल्याने गंभीर आजार वाढले आहेत.

पोलिसांचे एक पाऊल पुढे
शहरातील गणेश मंडळांनी सर्वोच न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपले ध्वनिक्षेपक ठरवून दिलेल्या मर्यादेत वाजवावेत. दिलेल्या आवाज मर्यादेचे उल्लंघन करू नये. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करीत गणेशोत्सव आनंदात साजरा करावा. पर्यावरण संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता फक्त गरज आहे जनतेच्या सहकार्याची, अन्यथा पोलिसांना कारवाई करणे भाग पडेल. याची खबरदारी मंडळांनी घ्यावी, असेही त्यांना सांगण्यात आले.