मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नका - डॉ. बोधनकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

वानाडोंगरी - पालकांनी मुलांना दूरदर्शन व भ्रमणध्वनीपासून दूर ठेवावे. आपल्या  अपेक्षांचे ओझे पालकांनी आपल्या मुलांवर लादू नये. इतर मुलांची आपल्या मुलासोबत तुलना करू नये. आईवडिलांनीसुद्धा मुलांसमोर आपले वर्तन अनुकरणीय ठेवावे, असे आव्हान इंटरनॅशनल प्रेसिडेंट कॉमन असोसिएशन फॉर हेल्थ डिसॅबिलिटीचे डॉ. उदय बोधनकर यांनी केले.

वानाडोंगरी - पालकांनी मुलांना दूरदर्शन व भ्रमणध्वनीपासून दूर ठेवावे. आपल्या  अपेक्षांचे ओझे पालकांनी आपल्या मुलांवर लादू नये. इतर मुलांची आपल्या मुलासोबत तुलना करू नये. आईवडिलांनीसुद्धा मुलांसमोर आपले वर्तन अनुकरणीय ठेवावे, असे आव्हान इंटरनॅशनल प्रेसिडेंट कॉमन असोसिएशन फॉर हेल्थ डिसॅबिलिटीचे डॉ. उदय बोधनकर यांनी केले.

दैनिक सकाळतर्फे आयोजित ‘फुलू द्या मुलांना’ या कार्यक्रमात महात्मा गांधी इंग्लिश मीडियम स्कूल, महात्मा गांधी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महात्मा गांधी हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर झलके होते. पाहुणे म्हणून ‘सकाळ’चे वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) विजय वरफडे, महात्मा गांधी इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापक धर्मेंद्र पारशिवनीकर, पर्यवेक्षिका दीपाली कोठे, सहाय्यक व्यवस्थापक रूपेश मेश्राम, विनायक इंगळे, सोपान बेताल, शुभम काथवटे, नीलेश्वर पटले व कोमल भाकरे होते. 

या वेळी शुभम मस्करे, प्रियांका घाटुर्ले, स्मिता पटले, सविता भोयर, सचिन मेश्राम या मुलांनी व पालकांनी डॉ. उदय बोधनकर यांना पाल्याविषयी विविध प्रश्‍न विचारले. त्यांच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर दिले. 

विजय वरफडे यांनी सकाळ माध्यम समूहातर्फे होणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. संचालन अनुराधा खडसे यांनी केले. अतिथींचा परिचय भारती टेकाडे व प्रांजली वाडकर यांनी करून दिला. आभार प्रिया डाखळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रा. प्रशांत तामसेटवार, आनंद नकाते, कल्पना भिसे, श्रुती जोशी, प्रीती कांबळे, कल्पना हिवराळे, माधवी वांधे, मंगला कठाणे, रामचंद्र वाणी, दशरथ बोडे, दीपिका नाटके, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. 

आपला मुलगा डॉक्‍टर, इंजिनिअर झाला पाहिजे, असे बहुतेक आईवडिलांना वाटते. परंतु, आपल्या मुलांची बौद्धिक क्षमता पाहून निर्णय घ्यावा. मुलांवर ताण येईल, अशी अपेक्षा ठेवू नये. ‘सकाळ’तर्फे नेहमीच मुलांच्या बौद्धिक विकासाकरिता कार्यक्रम आयोजित करण्यात येतात,  असेच कार्यक्रम सातत्याने ठेवावे.
- मधुकर झलके, मुख्याध्यापक, महात्मा गांधी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय. 

शालेय विद्यार्थ्यांसाठी सकाळ-एनआयईतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होऊन त्यांना पुढच्या आयुष्यासाठी मोठी प्रेरणा मिळते. असेच उपक्रम नियमित होत राहिल्यास विद्यार्थी आत्मनिर्भर, निडर बनतील.
- धर्मेंद्र पारशिवनीकर, मुख्याध्यापक, महात्मा गांधी इंग्लिश मीडियम स्कूल.

पालकांनी आपल्या मुलांच्या दैनंदिन वर्तनाकडे त्यांच्या खाण्यापिण्याकडे, त्यांच्या मित्र-मैत्रिणी कोण आहेत, कसे आहेत याबाबत लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांना चॉकलेट, पिझ्झा, मॅगी व पाणीपुरीपासून यासारख्या जंकफूडपासून दूर ठेवा. दैनंदिन जेवणात राजगिऱ्याचे लाडू, पपई, मेथी, पालक, मोड आलेले धान्य, उसळ, गुळाची चिक्की व पालेभाज्यांचा वापर करा. सकाळी विद्यार्थ्यांनी उपाशीपोटी शाळेत येऊ नये. रात्री लवकर झोपावे. सकाळी लवकर उठावे.
- डॉ. उदय बोधनकर