डॉ. सीमा साखरे यांच्या कन्येचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

खापरखेडा - सावनेर तालुक्‍यातील पिपळा डाक बंगला येथे नागपूर-छिंदवाडा महामार्गावरील पुलावर गुरुवारी अडीचच्या सुमारास नॅनो कारने उभ्या असलेल्या आयशर ट्रकला मागाहून जबर धडक दिली. या भीषण अपघातात कारचालक ॲड. सुहासिनी त्र्यंबकराव साखरे (वय ४४) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्या ज्येष्ठ समाजसेविका डॉ. सीमा साखरे यांच्या कन्या होत.

नागपूर-सावनेर हायवेवर पिपळा डाक बंगला येथे असलेल्या पुलावर इसराइल हनीफ शेख (वय ३१, रा. वर्धमाननगर) याने त्याचा नादुरुस्त आयशर ट्रक दुपारी बारादरम्यान रस्त्यावरच उभा केला. दुरुस्तीसाठी शेख व क्‍लीनर ट्रक सोडून बाहेर निघून गेले होते. मात्र, त्यांनी ट्रकच्या आजबाजूला धोक्‍याची सूचना देण्याची काहीच व्यवस्था केली नाही. दुपारी अडीचच्या सुमारास ॲड. साखरे कारने नागपूरकडे येत असताना त्यांची कार ट्रकवर धडकली. यात कारचा चुराडा होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ॲड. साखरे या अविवाहित होत्या.
त्यांच्या अपघाताची वार्ता सगळीकडे पसरली. खापरखेडा पोलिसांनी लागलीच घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या प्रकरणी खापरखेडा पोलिस ट्रकचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची शक्‍यता आहे.