अकरावी प्रवेशाचा शुभारंभ उद्यापासून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

प्रक्रिया ऑनलाइन - शाळांमध्ये आजपासून मिळणार माहिती पुस्तिका

नागपूर - नागपूर विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशप्रक्रिया मंगळवारपासून (ता. ६) सुरू होणार आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेची विक्री शाळांमधून केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा पहिला भाग संकेतस्थळावर भरता येईल, असे नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्य वतीने कळविण्यात आले आहे.

अकरावी प्रवेशासाठी सुरू असणारी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया बंद करत यंदापासून सर्वच शाखांचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. यामुळे कोचिंग क्‍लासेससोबत टायअप करून दुकानदारी चालविणाऱ्या महाविद्यालयांना चांगलाच धक्का बसला. 

शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे सर्व महाविद्यालयांमधील प्रवेश आता ऑनलाइन होणार असल्याने नामवंत महाविद्यालयांची दादागिरीही थांबेल, हे विशेष. 

नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय पद्धतीने अकरावीची प्रवेशप्रक्रिया राबविली जात होती. शिक्षण विभागातर्फे यंदा नागपूरसह राज्यातील काही प्रमुख शहरांत ऑनलाइन पद्धतीने अकरावीचे प्रवेश केले जाणार आहेत. शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर अकरावी प्रवेशाची माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी  व पालकांनी माहिती पुस्तिकेचे काळजीपूर्वक वाचन करून प्रवेश अर्ज भरावा, असे आवाहन केले. अकरावी प्रवेश अर्जाचे दोन भाग करण्यात आले असून, पहिल्या भागात विद्यार्थ्यांनी वैयक्तिक माहिती भरायची आहे. प्रवेश अर्जाचा केवळ एक भाग भरणाऱ्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही. 

शहरात सहा प्रमुख केंद्र 
नागपूर शहरामध्ये सहा प्रमुख केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रांमध्ये सोमवारपासून माहिती पुस्तिका उपसंचालक कार्यालयातून मिळणार आहेत. या पुस्तिका अन्य १३ उपकेंद्रांना याच दिवशी वितरित केल्या जाणार आहेत. या केंद्रामधून शाळांनी या पुस्तिका प्राप्त करून  घ्याव्या, असे आवाहन केले आहे.

विदर्भ

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - वाढत्या तापमानामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे चित्र होते.  परंतु, बदलत्या वातावरणातही स्वाइन फ्लूचा...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पदव्युत्तर शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून,...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017