पाच विमाने इतरत्र वळविली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

नागपूर - मुसळधार पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फटका विमान सेवेलाही बसला. योग्य दृश्‍यता नसल्याने नागपूरच्या आकाशात पोहोचलेल्या विमानांना ऐनवेळी इतरत्र हलविण्यात आले. यात इंडिगोच्या चार विमानांसह एका वायुदलाच्या विमानाचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. 

विमानतळावरील सूत्रांच्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास नागपूरच्या आकाशात ढगांची गर्दी झाली. त्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने दृश्‍यता अगदीच कमी झाली. यामुळे विमान धावपट्टीवर उतरविणे धोक्‍याचे होते. अशा स्थितीत एकामागून पोहोचलेल्या इंडिगोचे मुंबई- नागपूर, दिल्ली-नागपूर, पुणे-नागपूर यासह चार विमानांना हैदराबाद विमानतळाकडे वळविण्यात आले. याच काळात पोहोचलेल्या वायुदलाच्या विमानालाही लॅंडिंगची परवानगी नाकारून भोपाळकडे रवाना करण्यात आले. दुपारनंतर पाऊस ओसरून परिस्थिती सामान्य झाल्यानंतर इंडिगोची चारही विमाने नागपुरात पोहोचली.