आई-बाबा माफ करा, मला नाही जगायचे!

आई-बाबा माफ करा, मला नाही जगायचे!

बेरोजगारीला कंटाळून युवतीची आत्महत्या
नागपूर - ‘आई-बाबा, मला माफ करा... आता मला जगायचे नाही. उच्चशिक्षित असूनही नोकरीसाठी धडपड करावी लागत आहे. आता प्रयत्न पण संपले... नोकरी मिळत नसल्यामुळे आत्महत्या करीत आहे...’ असे लिहून तरुणी नमिता भोजराज देशपांडे (२७, रा. जलारामनगर, कळमना) हिने गळफास घेतला. या प्रकरणी कळमना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

नमिता ही वृद्ध आईवडिलांसोबत कळमन्यातील जलारामनगरात राहत होती. मोठा भाऊ पुणे पोलिस दलात आहे. वडील शासकीय सेवेतून निवृत्त झालेत. ती एमकॉमपर्यंत शिकली असून, वर्षभरापासून नोकरीसाठी धडपड करीत होती. मात्र, नोकरी मिळत नसल्यामुळे तिला नैराश्‍य आले. त्यामुळे १५ दिवसांपासून तणावात होती. तिच्या वागणुकीत बदल झाला होता. आईने सामंजस्याने तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता.सोमवारी दुपारी २ वाजता ती अभ्यासासाठी वरच्या माळ्यावर गेली. मात्र, चार वाजता चहा घ्यायला आली नाही. त्यामुळे आईने तिला हाक दिली. प्रतिसाद न मिळाल्यामुळे दार ठोठावले. दार उघडत नसल्याचे पाहून त्यांना संशय आला. त्यामुळे पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. दार उघडताच नमिता गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.

स्वप्नाचा चुराडा
नमिताला बॅंक अधिकारी व्हायचे होते. तिने बाराव्या वर्गापासूनच तयारी केली होती. तिने कॉमर्स शाखेतून पदवी घेतली. त्यानंतर पदव्युत्तरसुद्धा झाली. बॅंकेच्या परीक्षा देण्यासाठी तयारीसुद्धा जोमात सुरू केली होती. मात्र, हाती आलेल्या अपयशाने नमिता खचली. शेवटी तिने जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com