धान्य बाजार अर्ध्यावर, नोटाबंदीने हरवला नूर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

नागपूर - ‘‘धान्य बाजारामध्ये नोटाबंदीनंतर ग्राहकांनी सलग सहा महिने पाठ फिरविली होती. त्यानंतर थोडीफार रंगत आली असली तरी त्यात ५० टक्के घट झालेली आहे. पूर्वी ग्राहक धान्यांची साठवणूक मोठ्या प्रमाणात घरी करीत असल्याने मोठी उलाढाल होत होती.  नोटाबंदीनंतर ग्राहकांच्या धान्य साठवणूक करण्याच्या प्रमाणात एकदम घसरण झालेली आहे. हा सर्वांत मोठा फटका बाजाराला बसला’’ असे मत ग्रेन मर्चंट असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी व्यक्त केले.  

नोटाबंदी चांगली की वाईट यावर एका वर्षानंतरही चर्चेचे फड रंगत असले तरी बाजारात नैराश्‍याचे वातावरण आहे. नोटाबंदीपूर्वी ग्राहकांकडे पैशाची उपलब्धता होती, खर्च करण्यावर बंधने नव्हती आता मात्र, या सर्वच व्यवहारावर ग्राहकांनीच बंधने आणली. त्याचा फटका सर्वच बाजारपेठांना बसला. परंतु, दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा व्यवसायावर कुठलाही परिणाम झाला नाही असे व्यवसायिकांचे म्हणणे आहे.

थोडी गती येताच दुसरा फटका - अजय मदान  
नोटाबंदीमुळे कपडा व्यवसाय प्रभावीत झाला. लग्न सराईतही ग्राहकांची खरेदी कमीच होती. सहा महिन्यांनंतर व्यवसाला गती आली असताना जीएसटीचा फटका बसला. त्यातून अद्यापही व्यवसाय सावरलेला नसल्याचे गांधी बाग कपडा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय मदान यांनी सांगितले.