सदाभाऊ खोत यांच्यावर कीटकनाशक फवारणीचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

नागपूर - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कीटकनाशकाची फवारणी करण्याचा प्रयत्न बुधवारी केला. फवारणी करणाऱ्या युवकांना पोलिसांनी तत्काळ अटक केली.

नागपूर - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कीटकनाशकाची फवारणी करण्याचा प्रयत्न बुधवारी केला. फवारणी करणाऱ्या युवकांना पोलिसांनी तत्काळ अटक केली.

गेल्या काही महिन्यांपासून यवतमाळ जिल्ह्यात फवारणीमुळे कीटकनाशके शरीरात गेल्याने 18 जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच अनेक जण दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत. मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी सदाभाऊ खोत आज यवतमाळमध्ये दाखल झाले. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची त्यांनी विचारपूस केली. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख मंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गेले. त्या वेळी काही युवकांनी सदाभाऊ खोत यांच्यावर पंपाने फवारणी केली. या पंपात कीटकनाशके होती का, याबद्दल अद्याप पोलिसांनी निश्‍चित काहीही सांगितले नाही. फवारणी करणाऱ्या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

यामुळे गोंधळ उडाल्याने पोलिसांनी सदाभाऊ खोत यांना संरक्षणात बाहेर काढले. आमदार बच्चू कडू यांनी मदत न केल्यास सचिवांवर कीटकनाशकांची फवारणी करू, असा इशारा दिला होता. त्यामुळे हे युवक प्रहार संघटनेचे होते का, याचाही तपास पोलिस करीत आहेत.