ए भाई, हेल्मेट कहाँ गया?

नागपूर - हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिस कर्मचारी.
नागपूर - हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिस कर्मचारी.

सात महिन्यांत पावणेतीन लाख वाहनचालकांना चालान

नागपूर - शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. ए भाई, हेल्मेट कहाँ गया, अशी विचारणा करण्यात आली. गेल्या सात महिन्यांत शहरातील पावणेतीन लाख वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ई-चालान आणि हार्ड चालानचा समावेश आहे. यात साडेतेरा कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.  

वाहतूक विभागाने वाहनचालकांनी वाहतुकीचे काटेकोरपणे नियम पाळावेत, यासाठी जनजागृतीची मोहीम हाती घेतली. स्वतः पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम्‌ यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक व्यवस्था सांभाळली होती. मात्र, वाहनचालक कशाचीही भीती न बाळगता नियमांची पायमल्ली करीत असल्याचे आयुक्‍तांना लक्षात आले. त्यामुळे त्यांनी वाहतूक शाखेचे उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांना कारवाईची धडक मोहीम राबविण्याचे आदेश दिले. 

वाहतूक नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात आले. यावर प्रतिबंध लावण्यासाठी पावती बूकवरून दंड फाडणे जिकरीचे आणि वादाचे कारण ठरत होते. तरीही अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांची पथके पावती बूक घेऊन चालान कारवाई केली. त्यानंतरही अनेकजण हेल्मेट घालत नव्हते. त्यामुळे आयुक्‍तांनी वाहनचालकाशी न बोलता मोबाईलने केवळ फोटो काढून ई-चालान घरी पाठविणे सुरू केले. मोबाईलने फोटो काढून प्रतिचालान ५०० रुपये रक्‍कम वाढविली. 

अडीच हजार मद्यपीचालकांवर कारवाई
शहरात मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. १ जानेवारी ते जुलैपर्यंत वाहतूक शाखेच्या मिठानीम दर्गा परिसरात असलेल्या चेम्बर-दोन कार्यालयाने २ हजार ५०२ वाहनचालकांवर ड्रंकन ड्राइव्ह अभियानांतर्गत कारवाई केली आहे. अशाचप्रकारे अन्य चार चेम्बरमधुनसुद्धा जवळपास ८ हजार मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. 

२३ हजार वाहनचालकांवर कारवाई
चेम्बर दोन कार्यालयांतर्गत येणाऱ्या परिसरात सिग्नल तोडणे, ट्रिपल जाणे, वेगात वाहन चालविणे, स्टॉप लाइनसमोर वाहन नेणे, राँगसाइड वाहन चालविणाऱ्या २३ हजार २०३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. सर्वाधिक कारवाई सीताबर्डी परिसरात करण्यात आली. या कारवाईतून एक कोटी रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात आला.

लवकरच सीसीटीव्हीवरून चालान
शहरात प्रत्येक चौकात सीसीटीव्ही लावण्याचे काम वेगात सुरू आहे. येत्या महिन्याभरात शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित होतील. त्यामुळे लवकरच आता वाहतूक पोलिस पोलिस नियंत्रण कक्षात लावलेल्या स्क्रीनवरून शहरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून चालान करणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे भाग पडणार आहे.

हेल्मेट चालान (हार्ड कॉपी)
चेम्बर एक (एमआयडीसी)      १,९२५
चेम्बर दोन (मिठानीम दर्गा)     ४,१२१
चेम्बर तीन (दोसरभवन)     २,१५३
चेम्बर चार (अजनी)     २,०५५
चेम्बर पाच (इंदोरा)     ३,१७३

अशी केली जनजागृती
पोलिसांनी हेल्मेट रॅली काढली. यासंदर्भात रेडिओ आणि टीव्हीवरून जाहिराती दिल्या. गांधीगिरी करून नियम मोडणाऱ्यांना गुलाबपुष्प वाटप करण्यात आले. एलसीडी लावलेले वाहन शहरातील चौकाचौकांत फिरवणे असे अनेक प्रयोग केलेत. मात्र, नागपूरकरांनी एकाही मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. 

हेल्मेट ई-चालान (फोटो कॉपी)
चेम्बर एक (एमआयडीसी)     ३१,४३१
चेम्बर दोन (मिठानिम दर्गा)     ९०,०००
चेम्बर तीन (दोसरभवन)     ३४,१६७
चेम्बर चार (अजनी)     ७०,०००
चेम्बर पाच (इंदोरा)     ४२,६१२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com