इंदिरा गांधी समारोह व्हर्सेस जनाक्रोश!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

नागपूर - काँग्रेसच्या चंद्रपूर येथे होणाऱ्या विभागीय जनाक्रोश मेळाव्याचाच दिवशी त्याच ठिकाणी इंदिरा गांधी जन्मशताब्दी समारोहाचे आयोजन केले असल्याने काँग्रेसचे दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या मेळाव्यासाठी नागपूरमधील दोन्ही गटांनी संपूर्ण ताकद लावली असून, शेकडो कार्यकर्ते रवाना करण्याचा निर्णय घेतला. विशेष काही नेते दोन्हींकडील बैठकीला उपस्थित असल्याने ते कुठल्या कार्यक्रमाला हजेरी लावतात याविषयी कार्यकर्त्यांमध्ये औत्सुक्‍य निर्माण झाले आहे. 

जिल्हा ग्रामीण काँग्रेसने आज जनाक्रोश मेळाव्यासाठी आज बैठक घेतली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार सुनील केदार, सुरेश भोयर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शेकडो कार्यकर्त्यांनी जनाक्रोश मेळाव्याला जाण्याची तयारी दर्शवली. दुसरीकडे शहरातील बड्या नेत्यांची आमदार निवास येथे बैठक झाली. या बैठकीत इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी समारोहाचा आढावा घेण्यात आला. माजी खासदार गेव्हा आवारी, आमदार सुनील केदार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री अनिस अहमद, माजी आमदार अशोक धवड, महापालिकेतील गटनेते तानाजी वनवे या बैठकीला होते. विशेष म्हणजे या दोन्ही बैठकांना आमदार सुनील केदार उपस्थित होते. यामुळे ते जनाक्रोश मेळाव्यात की इंदिरा गांधी जयंती समारोहाच्या कार्यक्रमात सहभागी होणार, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांना पडला आहे.

चंद्रपुरातही दोन गट
शहरातील काँग्रेसमध्ये माजी खासदार विलास मुत्तेमवार विरुद्ध माजी मंत्री चतुर्वेदी-राऊत असे दोन गट निर्माण झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मुत्तेमवार गटाला झुकते माप देत असल्याचा त्यांचा आरोप आहे. प्रदेशाध्यक्ष हटवण्यासाठी त्यांनी आघाडीसुद्धा निर्माण केली आहे. याकरिता इंदिरा गांधी जन्मशताब्दी समारंभाचा कार्यक्रम आखला. याकरिता सोनिया गांधी यांनी उपस्थित राहावे, असाही प्रयत्न केला. स्वतंत्र विदर्भ प्रदेश समिती स्थापन करण्याचीही मागणी केली. अशीच परिस्थिती चंद्रपूरमध्ये माजी खासदार नरेश पुगलिया विरुद्ध आमदार विजय वडेट्टीवार आहे. विभागीय जनाक्रोश मेळावा घेण्याचा निर्णय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरला घेण्याचे ठरविल्यानंतर पुगलिया गटाने त्याच दिवशी जन्मशताब्दी समारोहाचा कार्यक्रम घेतला आहे. यात शक्तिप्रदर्शन केले जाणार असल्याने दोन्ही गटांनी ते प्रतिष्ठेचे केले आहे.