खोब्रागडेंनी बांधलेल्या फ्लॅटची पाहणी करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

नागपूर - आर्मर्स बिल्डर्सचे संचालक आनंद खोब्रागडे यांनी वेगवेगळ्या भागांमध्ये बांधलेल्या बांधकाम प्रकल्पातील फ्लॅटची संयुक्त पाहणी करण्याचे निर्देश मंगळवारी (ता. २२) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले.

काही दिवसांपूर्वी उपराजधानीमध्ये उच्चदाब विद्युत वाहिन्यांमुळे जीव गमावण्याच्या दोन घटना घडल्या. यापैकी एका घटनेमध्ये सुगतनगरातील अकरा वर्षीय धर या जुळ्या बांधवांना जीव गमवावा लागला. अन्य एका घटनेमध्ये हिंगणा परिसरातील स्वयं उमेश पांडे या पाच वर्षीय चिमुकल्याचा जीव गेला. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनांची दखल घेत न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.

याप्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीत खोब्रागडे यांनी त्यांच्यावर लादलेले आर्थिक व्यवहारासंबंधीचे सर्व निर्बंध हटविण्याची विनंती केली. न्यायालयाने खोब्रागडे यांच्या निर्माणाधीन तसेच बांधलेल्या प्रकल्पांची माहिती मागितली होती. ती मंगळवारी न्यायालयात सादर केली. न्यायालयाने लादलेल्या निर्बंधांमुळे वेगवेगळ्या जागेवरील सहा फ्लॅट विकण्यास खोब्रागडे यांना अडचण जात असल्याचा मुद्दा मांडण्यात आला.

 खोब्रागडे यांनी मांडलेल्या मुद्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने या सहा फ्लॅटची पाहणी करण्याचे निर्देश न्यायालय मित्र ॲड. श्रीरंग भांडारकर, महापालिकेचे वकील सुधीर पुराणिक आणि खोब्रागडे यांचे वकील अंजन डे यांना दिले. यांनी संयुक्त पाहणी करून न्यायालयात अहवाल द्यायचा आहे. तोपर्यंत न्यायालयाने खोब्रागडेंवरील आर्थिक निर्बंध हटविण्यास नकार दिला.

दोन ते तीन दिवसांमध्ये तपास करा

अवैधरीत्या झालेल्या बांधकामामुळे मुलांचा जीव गेल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यामुळे विक्रीसाठी असलेले हे फ्लॅट योग्यरीत्या बांधलेले आहेत की नाही. मंजूर केलेल्या बांधकाम आराखड्याशिवाय बांधकाम झाले आहे का याबाबतचा अहवाल सादर करायचा आहे. ही  तपासणी दोन ते तीन दिवसांमध्ये करण्यास न्यायालयाने सांगितले.