ल्युपिनच्या गोळ्यांच्या निर्यातीचा श्रीगणेशा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

नागपूर - मिहान-सेझला संजीवन देणाऱ्या ल्युपिन फार्मा कंपनीच्या गोळ्यांची पहिली खेप आज अमेरिकेला पाठविण्यात आली आहे. यूएस फूड ॲण्ड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशने (यूएस एफडीए) ल्युपिनच्या औषधांच्या विपणनाचा मार्ग मोकळा केला होता. त्यानुसार कंपनीने व्यावसायिक उत्पादनाचा श्रीगणेशा केला आणि अमेरिकेतील बाजारपेठेत येथील उत्पादित गोळ्या निर्यातीस सुरुवात केली आहे.  

या युनिटमध्ये तयार होणारे जेनरिक यूएस, जपान या विकसित देशातील बाजारात निर्यात करण्यात येणार आहे. अमेरिकेकडून मान्यता मिळाल्यानंतर डॉक्‍सिसायक्‍लिन हायक्‍लेटच्या १०० मिली ग्रॅमच्या गोळ्यांना अंतिम मंजुरी मिळाली. त्यानुसार या गोळ्यांची पहिली खेप अमेरिकेला पाठविण्यात आली आहे. भारत आणि जपानमध्ये ल्युपिन फार्माचे कारखाने आहेत. मिहान-सेझ प्रकल्पातील युनिटमध्ये कर्करोगावर प्रतिबंधक औषध तयार करणार आहे.

ल्युपिन फार्मा ही औषध निर्माणक्षेत्रातील अव्वल बहुराष्ट्रीय कंपनी आहे. मिहानमधील विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये (सेझ) या कंपनीने २०११ मध्ये २४ एकर जागा घेतली. २०१२ मध्ये कंपनीने बांधकामास सुरुवात केली. यामध्ये ४०० कोटींची गुंतवणूक केली आहे. दोन वर्षापूर्वीच ल्युपिन फार्माचे सर्वच जेनरिक द्रव्य खरे उतरले होते. त्यानंतर ल्युपिन फार्माचे मिहान-सेझमधील युनिट पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू केले. त्यानुसार पहिली खेप पाठविताना साइट प्रमुख सुमित सांळुखे, मिहान सेझचे सहाय्यक विकास आयुक्त अकरम अली, पीडीएल प्रमुख अरविंद रैकवार, गुणवत्ता प्रमुख अरविंद यादव, साइट एचआर प्रमुख टी. विजय कुमार उपस्थित होते. या युनिटमध्ये गोळ्या, कॅप्सुल्स, लस उत्पादित केले जाणार आहे. त्याचेही अमेरिकेसह युरोपमध्ये निर्यात करण्यात येणार आहे.

जेनेरिकसाठीचे द्रव्य तयार
औषधनिर्मितीसाठी लागणारे जेनेरिक तयार करण्यात येत आहे. महागाड्या औषधामुळे जेनेरिकबद्दल सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. या जेनेरिक औषधांना लागणारे द्रव्य कंपनी तयार करणार आहे.