मेडिकलचे जेरियाट्रिक सेंटर रखडले

मेडिकलचे जेरियाट्रिक सेंटर रखडले

नागपूर - उपराजधानीतील वय वर्षे ७५ असलेल्या वृद्धांसाठी गुड न्यूज होती. वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ३० खाटांचे जेरियाट्रिक सेंटर तयार होणार होते.

केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने मंजुरी दिली. मेडिकलने प्रस्ताव सादर केला. परंतु, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या उदासीन धोरणामुळे वर्षभर याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. ११ कोटी रुपये खर्चून तयार होणाऱ्या केंद्रात राज्याचा वाटा ४ कोटी ४४ लाख आहे. हा निधी राज्याने अद्याप दिला नाही. यामुळे केंद्र शासनाच्या पुढाकाराने वृद्धांच्या कल्याणासाठी असलेले केंद्र अद्याप रखडले आहे. यासाठी केंद्राचा ६० टक्के आणि राज्याचा ४० टक्के असे निधीच्या वाटाघाटीचे निकष आहेत. यामुळेच विदर्भातील वृद्धांच्या हिताचा असलेला जेरियाट्रिक सेंटरचा प्रकल्प अधांतरी आहे. 

केंद्र शासनाने देशात ८ जेरियाट्रिक सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला असून नागपूर मेडिकलची निवड झाली आहे. आठही संस्थांमध्ये वृद्धांसाठी उभारण्यात येणाऱ्या केंद्रासाठी ४३७ कोटींची तरतूद केली. नागपूरच्या केंद्रासाठी ११ कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. खाटांसह आंतररुग्ण विभागाची स्वतंत्र सोय, तज्ज्ञ डॉक्‍टर, परिचारिका, अटेंडन्टसह विविध मनुष्यबळ व साधने उपलब्धता या केंद्रामार्फत केली जाणार आहे.

जेरियाट्रिक केंद्रात औषधांसह, वृद्धांच्या आजारावर संशोधन कार्य, प्रशिक्षण, लसीकरण होईल. तसेच वृद्धांसाठी स्वयंचलित खाटा, व्हेंटिलेटरसह जागतिक दर्जाची उपकरणांवर निदानाची सोय होणार होती. ‘राष्ट्रीय वरिष्ठ जनआरोग्य योजने’अंतर्गत या प्रकल्पाला (आरव्हीजेएसवाय) वर्षभरापूर्वीच हिरवी झेंडी मिळताच अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला सादर केला. या केंद्रामुळे पदव्युत्तर जागा वाढतील.

जेरियाट्रिक सेंटरचा तपशील 
  पायाभूत सुविधा आणि फर्निचर - २ कोटी
  मनुष्यबळ - ४ कोटी १८ लाख
  लसीकरण व औषधांसाठी - २ कोटी
  यंत्रसामग्रीसाठी - ५० लाख
  प्रशिक्षणासाठी- २० लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com