‘हेल्थ मेडिसिटी’मुळे वाढणार वैद्यकीय पर्यटन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

नागपूर - मिहानमध्ये एम्स, कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि आता इंडो-युके इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेडिसिटी हा प्रकल्प सुरू होतोय. यामुळे विदर्भाला त्याचा फायदा होणार आहे. या प्रकल्पांनी विदर्भ वैद्यकीय हब होणार आहे. त्यामुळे वैद्यकीय पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

नागपूर - मिहानमध्ये एम्स, कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि आता इंडो-युके इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेडिसिटी हा प्रकल्प सुरू होतोय. यामुळे विदर्भाला त्याचा फायदा होणार आहे. या प्रकल्पांनी विदर्भ वैद्यकीय हब होणार आहे. त्यामुळे वैद्यकीय पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

वर्धा मार्गावरील ली-मेरिडियन हॉटेल येथे इंडो-युके इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेडिसिटीच्या कोनशिला अनावरणप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात महापौर नंदा जिचकार, खासदार कृपाल तुमाने, खासदार अजय संचेती, ट्रेड इकॉनॉमिक ॲण्ड प्रास्पेरिटी ब्रिटिश हायकमिशनातील अर्थ, व्यापार आणि आर्थिक व्यवहार विभागाच्या उपसंचालक जेन ग्रेडी, हेल्थ मेडिसिटी आणि ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय राजन गुप्ता, आमदार सुधाकर, प्रकाश गजभिये, आशीष देशमुख, विभागीय आयुक्त डॉ. अनुपकुमार, एमएडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश कांकाणी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली केलेल्या इंग्लंडच्या दौऱ्यानंतर या प्रकल्पाला सुरुवात झाली.

त्यानुसार देशात अशा प्रकारच्या ११ हेल्थसिटी प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यातून १७ हजार ६०० कोटींची गुंतवणूक होईल. त्यापैकी मुख्य हेल्थ मेडिसिटी नागपुरात होणार आहे. राज्यातील हा एकमेव प्रकल्प आहे.

यामध्ये १ हजार बेडचा समावेश आहे. काही वर्षांपूर्वी नागपुरात मिहान प्रकल्पास सुरुवात झाली. त्यात ठिकाणी वैद्यकीय पर्यटनासाठी जागा राखीव ठेवण्यात आली होती. मात्र, नव्या सरकारने त्यावर लक्ष केंद्रित करून एम्स, कॅन्सर हॉस्पिटलसारखे प्रकल्प आणण्यात यश मिळविले. 

५५ लाखांची सुविधा पाच लाखांत
नागपूरसारख्या ठिकाणी ५५ लाखांची वैद्यकीय सुविधा पाच लाखांत उपलब्ध होणार आहे. नागपूर टायगर कॅपिटल आहे. त्यामुळे देशविदेशातील लोकांच्या आकर्षणाचे केंद्रही आहे. आता ते मेडिसिटीमुळे ते आकर्षण वाढेल. २०१९ पर्यंत मेडिसिटीचा पहिला टप्पा पूर्ण करून सात वर्षांत उर्वरित काम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यांच्या हस्ते संस्थेच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.