माझी मेट्रो आणखी ‘पॉवर’फूल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

नागपूर - मेट्रो रेल्वे प्रकल्पाला वीजपुरवठा सुरू झाला असून, माझी मेट्रो आणखी ‘पॉवर’फूल झाली. खापरीतील उपकेंद्रात वीजजोडणीची कामे पूर्ण झाल्यानंतर ओव्हर हेड इलेक्‍ट्रिक लाइनवर पुरवठा सुरू करण्यात आला. माझी मेट्रोच्या डब्यांचीही चाचणी घेण्यात आली. मिहान डेपो ते विमानतळापर्यंत सामान्य नागरिकांना डिसेंबरपासून प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. 

स्वातंत्र्यदिनापर्यंत खापरी येथील उपकेंद्राला वीजपुरवठ्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र, तीन दिवसांपूर्वीच मेट्रो रेल्वे ओएचईच्या तंत्रज्ञांनी काम पूर्ण केले. खापरी वीज उपकेंद्र ते मेट्रो रेल्वेच्या उपकेंद्रापर्यंत सात किमी अंतरात भूमिगत तारा टाकून वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मेट्रोसाठी तयार करण्यात आलेल्या ओव्हर हेड इलेक्‍ट्रिक लाइनवर शनिवारी वीजपुरवठा सुरू करण्यात आला. आतापर्यंत शटिंग वाहनाने मेट्रो रेल्वेच्या डबे ओढले जात होते. प्रथमच ओव्हर हेड इलेक्‍ट्रिक लाइनवरून मेट्रोच्या डब्यांनाही ‘पेंटा’द्वारे वीजपुरवठा सुरू करण्यात आला.  त्यानंतर मेट्रो रेल्वेची विजेवर चाचणी घेण्यात आली. संपूर्ण सुरक्षेत घेण्यात आलेल्या या चाचणीदरम्यान मेट्रो रेल्वेचे डबे प्रथमच विजेवर धावले.

मेट्रो रेल्वेचा हॉर्न वाजताच येथील तंत्रज्ञ, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाट केला. महामेट्रोचे व्यवस्थापकीय  संचालक ब्रजेश दीक्षित यांनी डिसेंबरपासून नागरिकांनाही मिहान डेपो ते विमानतळापर्यंतच्या जमिनीवरील ट्रॅकवर धावणाऱ्या मेट्रोतून प्रवासाचा आनंद लुटता येणार असल्याचे सांगितले होते.