नागपूरच्या मदर डेअरीचे रविवारी उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

नागपूर - गेल्या तीन वर्षांपासून विदर्भात अनेक प्रकल्प व संस्था सुरू होत आहे. याच मालिकेत येत्या रविवारी (ता. 4) मदर डेअरीचा एक प्रकल्प नागपुरात सुरू होत आहे. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्‌घाटन होणार आहे. या वेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.

शासकीय दूध योजनेची जागा मदर डेअरीला देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून शासकीय दूध योजनेत दूध संकलनाचे काम बंद आहे. तसेच दुधापासून भुकटी तयार करण्याचाही प्रकल्प बंद पडला आहे. शासकीय दूध योजनेकडे असलेल्या 50 एकर जागेपैकी 39 एकर जागा मदर डेअरीला देण्यात आली आहे. मदर डेअरीमुळे दुग्धजन्य पदार्थाच्या उत्पादनाला गती मिळण्याची शक्‍यता आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा व नागपूर या जिल्ह्यांमध्ये दूध उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.