सरपंचपदासाठी वेगळ्या रंगाची मतपत्रिका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

नागपूर - सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवड होणार असून, यासाठी फिकट निळ्या रंगाची मतपत्रिका असणार आहे.

नागपूर - सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवड होणार असून, यासाठी फिकट निळ्या रंगाची मतपत्रिका असणार आहे.

आघाडी सरकारच्या काळात सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्यात आली होती. मात्र, हा प्रयोग अयशस्वी वाटल्याने सरकारने पुन्हा निवडणुकीची प्रक्रिया बदलली. ग्रामंपचायत सदस्यांमधून सरपंचाची निवड प्रक्रिया आणली. आता फडणवीस सरकारकडून यात बदल करून सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला. राज्यात काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका याच पद्धतीने घेण्यात आल्या. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्याच्या निवडीसाठी मतदारांना मतदान करावे लागले. यासाठी एकाच रंगाची मतपत्रिका होती. यामुळे मतदारांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे आता मतपत्रिकेच्या रंगात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सरपंच पदासाठी निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांसाठी फिक्कट निळ्या रंगाची मतपत्रिका असणार आहे, तर ग्रामपंचायत सदस्यांसाठी पूर्वीप्रमाणेच मतपत्रिका असेल. यामुळे मतदारांना सरपंच आणि सदस्यांकरिता मतदान करताना सोपे होणार असल्याचे बोलले जात आहे.

सरपंचपदाच्या उमेदवारास प्रथम चिन्ह
सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसाठीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नसल्याने प्रत्येकास स्वतंत्र चिन्ह मिळते. या चिन्हाचे वाटप करताना प्रथम सरपंचपदासाठी उभे असलेल्या उमेदवारास चिन्ह वाटप होणार आहे. हे चिन्ह गोठविण्यात आल्यानंतर उर्वरित चिन्हे सदस्यपदासाठीच्या उमेदवारांना वाटली जाणार आहेत.

Web Title: nagpur vidarbha news multiple colour ballet paper for sarpanch post