पटोले सिमेंट रस्त्यांवर घसरले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

नागपूर - कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी तर कधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडणारे भाजपचे भंडारा येथील खासदार नाना पटोले यांनी नुकतेच सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनाही लक्ष्य केले. आता भाजप सत्तेत असलेल्या नागपूर महापालिकेवरही त्यांनी ताशेरे ओढले.

शहरातील सिमेंट रस्त्याची वर्षभरात दुरवस्था झाली असून, अनियमिततेकडे त्यांनी आयुक्त अश्‍विन मुद्‌गल यांचे लक्ष वेधले. खासदार पटोले अचानक महापालिकेत आल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.

शहरातील सिमेंट रस्त्यांचा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी आहे. त्यावर टीका करीत खासदार पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपला घरचा अहेर दिल्याची चर्चा रंगली आहे.

सध्या ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करीत असल्याने चर्चेत आहेत. आज ते अचानक महापालिकेत आले. ते नातेसंबंधातील एका व्यक्तीच्या संपत्तीवर अवैधरीत्या ताबा करणाऱ्यांविरोधात तक्रार करण्यास आले होते. मात्र, त्यांनी दीक्षाभूमीसमोरील त्यांच्या घरासमोरील सिमेंट रस्त्याला वर्षभरातच तडे गेल्याचे नमूद करीत या कामात अनियमितता होत असल्याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले. ३० सप्टेंबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन असून, या परिसरात लाखो भाविक येणार आहेत. मात्र, अद्याप सिमेंट रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. लवकरात लवकर सिमेंट रस्त्यांची कामे पूर्ण करण्याच्या लालसेपोटी कंत्राटदार रस्त्यांची गुणवत्ताच वाईट करून ठेवतील, त्यामुळे दीक्षाभूमी येथील कार्यक्रमानंतर सिमेंट रस्त्यांची कामे करावी, अशी सूचना त्यांनी आयुक्तांना केली. यावेळी दीक्षाभूमीबाबत विविध समस्यांचे निवेदन घेऊन आलेले रिपाइं (ए)चे शहर अध्यक्ष बाळू घरडेही आयुक्तांना भेटण्यास आले होते. पटोले यांनी शिष्टमंडळाच्या मागण्यांचे समर्थन करीत दीक्षाभूमी परिसरात स्टॉल लावण्यासाठी जागा देण्याचीही मागणी केली.