बायोमेट्रिकच्या आधारावर वेतन कपात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

सुरक्षा बलाच्या जवानांमध्ये रोष - मुख्यमंत्र्यांनी दखल घेण्याची मागणी

नागपूर - अतिमहत्त्वाच्या, संवेदनशील आस्थापनांची सुरक्षा सांभाळणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) जवानांच्या वेतनाची सुरक्षा बलाकडूनच कपात केली जात आहे. यासाठी बायोमेट्रिक मशीनचा आधार घेऊन सरसकट वेतन कपात केल्याचा आरोप सुरक्षा बलाच्या जवानांनी केला.

आर्थिक शोषणासंदर्भात जवानांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुद्दा उघडकीस आणला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. परंतु, सहा महिने लोटूनही कारवाई झाली नाही. उलट बायोमेट्रिक मशीनच्या नावाखाली कपात करणे सुरू झाल्याचे चित्र आहे. 

या मंडळाचे प्रमुख पोलिस महासंचालकपदाचे अधिकारी असतात. दोन वर्षांपासून जवानांच्या वेतनात वाढ झाली नाही. शिवाय एका जवानामागे मंडळाकडून २२ ते २६ हजार रुपये आस्थापनांकडून वसूल करण्यात येतात. मात्र, जवानांना १४ ते १६ हजार रुपयेच वेतन दिले जात असल्याचा आरोप आहे.

काही महिन्यांमध्ये मंडळाने १४ हजारांच्या वेतनात गैरहजेरी दाखवून जवानांचे ५ ते ६ हजार रुपयांपर्यंत वेतन कपात केली. यासंदर्भात प्रशासनाला जाब विचारण्याची हिंमत करणाऱ्या जवानांवर कारवाई करून बाहेरचा रस्ता दाखविला जाते. त्यामुळे बेरोजगारीच्या भीतीने मूग गिळून मंडळाच्या बुक्‍क्‍यांचा मार सहन करीत आहेत.

तक्रारीकडे दुर्लक्ष
काही महिन्यांपासून मंडळाने बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी सुरू झाली. या आधारावरच जवानांना वेतन दिले जाते. मात्र, अनेकदा मशीनमध्ये बिघाड होतो. त्याची प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जाते. शिवाय मशीनमध्ये अनेकदा हजेरीची नोंद होत नाही. अशावेळी हजर असणाऱ्या जवानांच्या वेतनावर मंडळातर्फे कात्री लावली जाते.