ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेन्शन द्या

नागपूर - निवृत्तिवेतनासाठी लढा देताना ग्रामपंचायतचे सेवानिवृत्त कर्मचारी.
नागपूर - निवृत्तिवेतनासाठी लढा देताना ग्रामपंचायतचे सेवानिवृत्त कर्मचारी.

नागपूर - ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सेवा गृहीत धरून २० वर्षांपेक्षा जास्त सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्याला दरमहा किमान चार हजार पेन्शन द्या किंवा एकमुश्‍त तीन लाख रुपये द्या, अशी मागणी घेऊन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी निवृत्तिवेतन (पेन्शन असोसिएशन) संघटनेच्या मोर्चाने विधानभवनावर धडक दिली. यशवंत स्टेडियम येथून प्रारंभ झालेला महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी निवृत्तिवेतन (पेन्शन असोसिएशन) संघटनेचा मोर्चा टेकडी रोड येथे आल्यावर अडविला. संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम बोहरे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी मोर्चेकऱ्यांनी मागण्यांच्या घोषणा दिल्या. त्यानंतर मार्गदर्शक आनंदराव ठवरे, पुरुषोत्तम बोहरे, उपाध्यक्ष गुलाब तलमसे यांनी संबोधित केले. मोर्चाला श्रीकांत बागडे, गजानन लोखंडे, निळकंठ साखरकर, किसनराव बलंग व बाळकृष्ण मानगर यांनी संबोधित केले.

प्रमुख मागण्या
निवृत्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दरमहा चार हजार रुपये पेन्शन द्या.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना एका वर्षाला १५ दिवसांची उपदानाची रक्कम द्या.
अर्जित रजा, वैद्यकीय रजा ३०० दिवसांच्या शिल्लक असल्यामुळे या बदल्यात रोख रक्कम द्या.
डॉ. दीपक म्हैसकर यांच्या शासननिर्णय समितीच्या शिफारसी लागू करून निवृत्तिवेतनासाठी ८७.०८ कोटींची तरतूद करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com