पंधरा दिवसांत पेट्रोल १.८७ रुपयांनी महागले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

नागपूर - पेट्रोलचे भाव दररोज वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा खिसा हलका होत आहे. गेल्या पंधरा दिवसांत १ रुपया ८७ पैशांची वाढ झालेली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. रविवारी रात्री १० पैसे प्रतिलिटर पेट्रोलच्या दरात वाढ झाली असून एक लिटर पेट्रोलसाठी आता ८२ रुपये १७ पैसे मोजावे लागणार आहेत. १५ मार्च रोजी पेट्रोलचे भाव ८० रुपये ३० पैसे प्रतिलिटर होते. जानेवारी महिन्यात नागरिकांनी ओरड केली होती. जनतेचा असंतोष लक्षात घेत राज्य आणि केंद्र सरकारने प्रत्येकी दोन रुपयांची कर कपात करीत हे भाव लिटरमागे ७६ रुपयांपर्यंत खाली आणले होते.

नागपूर - पेट्रोलचे भाव दररोज वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा खिसा हलका होत आहे. गेल्या पंधरा दिवसांत १ रुपया ८७ पैशांची वाढ झालेली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. रविवारी रात्री १० पैसे प्रतिलिटर पेट्रोलच्या दरात वाढ झाली असून एक लिटर पेट्रोलसाठी आता ८२ रुपये १७ पैसे मोजावे लागणार आहेत. १५ मार्च रोजी पेट्रोलचे भाव ८० रुपये ३० पैसे प्रतिलिटर होते. जानेवारी महिन्यात नागरिकांनी ओरड केली होती. जनतेचा असंतोष लक्षात घेत राज्य आणि केंद्र सरकारने प्रत्येकी दोन रुपयांची कर कपात करीत हे भाव लिटरमागे ७६ रुपयांपर्यंत खाली आणले होते. हा दिलासा मात्र फार काळासाठी टिकला नाही आणि अवघ्या दोन महिन्यांत सरकारने पेट्रोलची किंमत ८२ रुपयांपर्यंत नेली आहे.

Web Title: nagpur vidarbha news petrol rate increase