राष्ट्रपतींचा मुक्काम साडेसात तास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

नागपूर - राष्ट्रपती रामनाथ कोविंद तब्बल साडेसात तास जिल्ह्यात राहणार असून, यादरम्यान विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून कामठी येथील मेडिटेशन सेंटर आणि शहरातील कवी सुरेश भट सभागृहाचे उद्‌घाटनही करणार आहेत. 

राष्ट्रपती कोविंद यांचे शुक्रवारी सकाळी दहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. येथून वाहनाने दीक्षाभूमीकडे जातील. दीक्षाभूमीवर जवळपास २० मिनिटे राहणार आहेत. येथून हेलिकॉप्टराने रामटेक येथे जातील. येथील शांतीनाथ जैन मंदिरला भेट देतील.

त्यानंतर हेलिकॉप्टरनेच कामठी येथील ड्रॅगन पॅलेसला येतील. ड्रॅगन पॅलेसला जवळपास १२.४५ ला पोहोचतील. येथे विपश्‍यना मेडिटेशन सेंटरचे उद्‌घाटन करतील. त्यांचा हा सर्व कार्यक्रम जवळपास पाऊण तास चालणार आहे. पोलिस मुख्यालय मैदान येथेही हजेरी लावणार असल्याची माहिती आहे.

हेलिकॉप्टरनेच राजभवन येथे येतील. येथे आराम करून वाहनाने सायंकाळी चारला रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहाच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला जातील. कार्यक्रम संपल्यानंतर वाहनानेच विमानतळ येथे जाणार असून, सायंकाळी साडपाचला दिल्लीकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे.