दमदार पावसाने उपराजधानी चिंब

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

दीड तासात ४० मिलिमीटर

नागपूर - धो-धो पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागपूरकरांची इच्छा अखेर वरुणराजाने सोमवारी पूर्ण केली. दुपारच्या सुमारास मेघगर्जनेसह आलेल्या दणकेबाज पावसामुळे अख्खे शहर ओलेचिंब झाले. अवघ्या दीड तासात बरसलेल्या ४० मिलिमीटर पावसाने उपराजधानीचा श्‍वास काही काळासाठी रोखून धरला. 

दीड तासात ४० मिलिमीटर

नागपूर - धो-धो पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागपूरकरांची इच्छा अखेर वरुणराजाने सोमवारी पूर्ण केली. दुपारच्या सुमारास मेघगर्जनेसह आलेल्या दणकेबाज पावसामुळे अख्खे शहर ओलेचिंब झाले. अवघ्या दीड तासात बरसलेल्या ४० मिलिमीटर पावसाने उपराजधानीचा श्‍वास काही काळासाठी रोखून धरला. 

गेल्या शुक्रवारी प्रथमच श्रावणसरी बरसल्यानंतर दोन दिवस कोरडे गेले. त्यामुळे कमालीचा उकाडा जाणवत होता. मात्र, सोमवारच्या धो-धो पावसाने नागपूरकर चांगलेच सुखावले. पावसाला दुपारी एकच्या सुमारास सुरुवात झाल्यानंतर जवळपास तास दीड-तास वरुणराजा ‘जम के’ बरसला. शहरात सर्वच भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. रस्त्यांवर सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. रामदासपेठ, व्हीआयपी रोड, बजाजनगर, शंकरनगर चौक, सीताबर्डी, धंतोली, मेडिकल चौक, कॉटन मार्केट चौक, सक्‍करदरा, नंदनवन, उमरेड रोड, दिघोरी, मानेवाडा चौक, महाल, इतवारी, छत्रपती चौक, प्रतापनगर, नरेंद्रनगर, खामला, सदर, काटोल रोड, कोराडी रोड, कळमना, पारडी, हिंगणा या परिसरांमध्ये ठिकठिकाणी गुडघा ते मांडीभर पाणी जमले होते. 

पाण्यातून दुचाकी व चारचाकी काढताना वाहनधारकांची चांगलीच दमछाक झाली. पावसाचा फटका वाहतुकीलाही बसला. हवामान विभागाने सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरात ३८.८ मिलिमीटर पावसाची नोंद केली. यातील बहुतांश पाऊस दुपारी एक ते अडीच या दीड तासातील होता. 

बच्चे कंपनीची धमाल
यावर्षीच्या पहिल्याच पावसाचा सर्वाधिक आनंद लुटला तो बच्चे कंपनीने. पाऊस थांबल्यानंतर कस्तुरचंद पार्क, नीरीसह अनेक भागांमध्ये तुंबलेल्या पाण्यात मुलांनी ‘स्वीमिंग’चा तसेच फुटबॉलचा आनंद घेतला. शिवाय तरुण-तरुणींनीही बाइकवर रपेट मारून आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेतला. नागपूरकरांचे आवडते ‘डेस्टिनेशन’ असलेल्या फुटाळ्यावर सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली.

विदर्भ

एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यातील कसनसुर जारावंडी मुख्य रस्त्यावरून वाहणारे झुरी नाला व कांदळी नाल्यावरील पुलाचे नुकसान...

02.09 PM

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - वाढत्या तापमानामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे चित्र होते.  परंतु, बदलत्या वातावरणातही स्वाइन फ्लूचा...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017