एकाच दिवशी अकरा मोर्चांची धडक

नागपूर - सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींना लक्ष्य करीत काढलेल्या मोर्चात सहभागी महिला.
नागपूर - सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींना लक्ष्य करीत काढलेल्या मोर्चात सहभागी महिला.

नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी (गुरुवारी) विविध संघटनांच्या एकूण ११ मोर्चांनी धडक देत आपापल्या मागण्या शासन दरबारी मांडल्या. आदिवासी संघर्ष समिती, ऑटोचालक व पाली विद्यापीठ निर्मिती संघर्ष समितीचे मोर्चे लक्षवेधी ठरले.

जन आरोग्य अभियान
जन आरोग्य अभियानने मोर्चा काढून शेतकरी, शेतमजूर व कामगारांच्या आरोग्यविषयक  प्रश्‍नांकडे लक्ष वेधले. डॉ. अभिजित मोरे, बंडू साने, डॉ. सुहास कोल्हेकर, शैलजा आरळकर व सोमेश्‍वर चांदूकर यांच्या नेतृत्वात यशवंत स्टेडियम येथून निघालेल्या मोर्चाला लिबर्टी टॉकीज चौकात अडविले.

मुख्यमंत्र्यांनी मोर्चास्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारण्याची मागणी  मोर्चेकऱ्यांनी लावून धरली. पोलिसांनी यशस्वी मध्यस्थी करीत मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाची संबंधित मंत्र्यांसोबत भेट घडवून आणली.

प्रमुख मागण्या
  सार्वजनिक आरोग्यसेवेचे अर्थसंकल्प वाढवून २० हजार कोटी रुपये करा.
  शेतकरी, शेतमजूर, कामगारांसाठी राजस्थान व दिल्ली सरकारच्या धरतीवर मोफत तपासण्या व औषध पुरवठ्याची योजना सुरू करा.
  खासगी रुग्णालयाच्या दरांवर नियंत्रण आणणारा आणि रुग्ण हक्कांना संरक्षण देणारा वैद्यकीय आस्थापना कायदा करा.
  वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरा.

कंत्राटी टीबी कर्मचाऱ्यांना नियमित करा
कंत्राटी तत्त्वावर २० वर्षांपासून कार्यरत क्षयरोग कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत नियमित करावे या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटनेने विधानभवनावर धडक दिली. काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांनी मोर्चात सहभागी होत कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांना पाठिंबा दर्शविला. राज्यातील २० ते २५ वैद्यकीय अधिकारी व ३० ते ३५ कर्मचाऱ्यांचा टीबीच्या आजाराने मृत्यू झाला आहे. सोबतच कर्तव्यावर असलेल्या १५ ते २० कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला. यानंतरही शासनाकडून कोणतीही मदत केली जात नसल्याने कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला.

प्रमुख मागण्या
समान काम समान वेतन देण्यासह टीबी कर्मचाऱ्यांना नियमित करा.
टीबी कर्मचाऱ्यांना पीएफ लागू करा.
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे रजा दिल्या जाव्या.
गरजेनुसार आंतरजिल्हा बदली तरतूद करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com