पोलिसांच्या तावडीतून पळाला ठाणेदार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

वर्दी बदलण्याचा केला बहाणा - दोन लाखांच्या लाचेतील आरोपी

नागपूर - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कुही पोलिस ठाण्याचे लाचखोर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष काळे आणि त्याचा सहकारी पीएसआय संजय चव्हाण यांना कुही रोडवरील अडवाणी ढाब्याच्या संचालकाकडून दोन लाखांची रक्‍कम घेताना मंगळवारी अटक केली होती. मात्र, वर्दी बदलून येण्याचा बहाणा करीत एसीबीच्या अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन काळे  फरार झाले. बुधवारी सायंकाळी धंतोली उद्यानाजवळ अटक करण्यात आली. 

पथकाने मंगळवारी रात्री एका हॉटेल व्यावसायिकाकडून वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष काळे व उपनिरीक्षक संजय चव्हाण यांना दोन लाखांची लाच घेताना अटक केली होती. याप्रकरणी काळे याने सुरुवातीला १० लाखांच्या लाचेची मागणी केली. नंतर ५ लाखांत सौदा फिक्‍स केला. टोकन म्हणून ४० हजार रुपये आधीच काढून घेतले आणि मंगळवारी पुन्हा लाचेचा पहिला हप्ता घेण्याकरिता ते आले होते. याचवेळी तो एसीबी पथकाच्या जाळ्यात अडकले. घटनेच्या दिवशी काळे याने आपल्या जवळील पिस्तूल काढून नौटंकी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसीबीच्या पथकाने तोही हाणून पाडला. यात लाचखोर चव्हाण जखमी झाला. कारवाईनंतर आरोपी काळे आणि चव्हाण यांनी फरार होण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी झालेल्या झटापटीत एसीबीच्या महिला कर्मचारी किरकोळ जखमी झाल्या. त्यामुळे या दोन्ही आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करून कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच कारवाईदरम्यान काळे याने तक्रारकर्ते अडवाणी यांच्यावर हल्ला करून त्यांना धक्का देऊन खाली पाडल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे या प्रकरणीही त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

धंतोली परिसरातून अटक
मंगळवारी ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातून बैठक आटोपून काळे व चव्हाण हे दोघेही खासगी वाहन घेऊन अडवाणी यांच्या ढाब्यावर दोन लाखांची लाच घेण्याकरिता गेले होते. याप्रकरणी एसीबीच्या पथकाने लाचखोर पीएसआय चव्हाणला मंगळवारी ताब्यात घेतले. तर,  आज दुसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी फरार पीआय काळेला धंतोली परिसरातून अटक करण्यात आली. 

काळेने संपत्तीची लावली विल्हेवाट
एसीबीने अटक केल्यानंतर आरोपीच्या घराची झडती घेण्यात येते. घरातील रक्‍कम आणि  सोन्याचे किंवा मौल्यवान वस्तूही एसीबी ताब्यात घेते, याची कल्पना असल्यामुळे पीआय काळे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. त्याने आठ तासांच्या काळात जमवलेल्या संपत्तीची  विल्हेवाट लावल्याची चर्चा आज पोलिस दलात होती.