तिघांना ट्रान्झिट रिमांड

तिघांना ट्रान्झिट रिमांड

नागपूर - पेट्रोलपंपावर पल्सर नावाची इलेक्‍टॉनिक मायक्रोचिप बसवून ग्राहकांचे पेट्रोल-डिझेल चोरी करण्याच्या प्रकरणात पोलिसांनी लेफर्ड थॉमस, सुरेश खेकाडे आणि मनीष वऱ्हाडे या तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले.

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने नवनीतसिंग तुली यांच्या मानकापुरातील रबज्योत ऑटोमोबाईल्स (पेट्रोलपंप)वर छापा मारून सोमवारी दोन मशीनला सील लावले होते. उपराजधानीतील पेट्रोलपंप संचालकांमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या या कारवाईनंतर ठाणे पोलिसांनी ही बेमालूम चोरी करणाऱ्या लेफर्ड थॉमस, सुरेश खेकाडे आणि मनीष वऱ्हाडे या तिघांना ताब्यात घेतले. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करून पोलिस त्यांना ठाण्याला घेऊन गेले. दरम्यान, पंप संचालक नवनीतसिंग तुली यांचीही या प्रकरणात चौकशी होऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे.

चौकशीसाठी पोलिस त्यांना ठाण्याला बोलवू शकतात. त्याचप्रमाणे नागपूरसह विदर्भातील आणखी काही पेट्रोलपंपावरही अशाचप्रकारे कारवाई केली जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. तुली यांच्या पेट्रोलपंपवर गेल्या अनेक महिन्यांपासून ग्राहकांना कमी पेट्रोल देऊन कोट्यवधींची फसवणूक झाली आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्यामुळे कुणीही पेट्रोलपंपवर चौकशी करीत नव्हते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक बिनधास्तपणे सुरू होती. 
 

कर्मचाऱ्यांची चलाखी
पेट्रोलपंपवर मशीनवर असलेले कर्मचारी हातचलाखी करून ग्राहकांची फसवणूक करतात. भांडेप्लॉट ते जगनाडे चौकाकडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या पेट्रोलपंपवरील कर्मचारी चार नोझल एकमेकांत गुंतवून एका मशीनमध्ये पैसे सेट करून दुसऱ्याच मशीनच्या नोझलने पेट्रोल भरून एकाच वेळी ५० ते १०० रुपयांचे पेट्रोल कमी भरतात, अशी माहिती एका फसवणूक झालेल्या ग्राहकाने दिली. 

‘झटका’ देऊन ‘कंची’
पेट्रोलपंपवरील कर्मचारी सेटिंगमध्ये बिघाड झाल्याचे सांगून ‘झीरो सेट’ न करताच पेट्रोल भरतात. २०० रुपयांचे पेट्रोल भरताना कर्मचारी नोझलला चार वेळा बंद करतो आणि झटका देतो. प्रत्येक वेळी दहा ते १५ रुपयांचे पेट्रोल तो कमी भरतो. हाताच्या झटक्‍यावर त्या पेट्रोलचे सेटिंग असते. त्यामुळे ग्राहक केवळ मशीनकडे पाहत असतो. दरम्यान, कर्मचारी तीन ते चार वेळा झटका मारून ४० ते ५० रुपयांचे पेट्रोल कमी भरतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com