वाघाच्या अवयवांची तस्करी करणारे दोघे अटकेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

दोघांना एक जुलैपर्यंत वन कोठडी - शिकार केल्याची कबुली

नागपूर - पेंच व्याघ्रप्रकल्पामध्ये येणाऱ्या उसरीपारमध्ये वाघाचे हाड आणि नखांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. रामटेक येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने १ जुलैपर्यंत वन कोठडी सुनावली. 

दोघांना एक जुलैपर्यंत वन कोठडी - शिकार केल्याची कबुली

नागपूर - पेंच व्याघ्रप्रकल्पामध्ये येणाऱ्या उसरीपारमध्ये वाघाचे हाड आणि नखांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. रामटेक येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने १ जुलैपर्यंत वन कोठडी सुनावली. 

पेंच व्याघ्रप्रकल्पातील तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणारे मच्छीमार वाघांची शिकार करीत असल्याचे अनेकदा वन विभागाच्या लक्षात आले. त्यामुळे पवनी येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना गस्तीदरम्यान वाघाच्या शिकारीची गुप्त माहिती मिळाली. दरम्यान, संशयावरून बाबुलाल कुमरे, देवीदास कुमरे (रा. उरसीपार, ता. रामटेक) या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात वाघांची नखे आणि हाडे आढळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली. वाघाची नखे आणि हाडे कोठून आणली याचे स्पष्टीकरण करू शकले नाही. तसेच त्याबद्दल ते उडवाउडवीची उत्तरे दिल्याने वन विभागाने या दोघांना वन कोठडीची मागणी केली. त्यानुसार एक जुलैपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली. उसरीपार येथे वाघाची नखे आणि हाडे असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानुसार वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पांडुरंग पाखले यांनी वन कर्मचाऱ्यांनी सापळा रचला. मध्य प्रदेशातील व्यापारी असल्याचा बनाव करून दहा हजार रुपयांत वाघाचे हाड आणि नखांचा सौदा केला. सोमवारी (२६ जून) रात्री खुर्सापार गावानजीक एका ठिकाणी भेटण्याचे निश्‍चित झाले. त्या ठिकाणावर वन विभागाची चमू दबा धरून बसली होती. आरोपी येताच वन कर्मचाऱ्यांनी त्यांना घेरले आणि अटक केली. दरम्यान, आरोपींनी वाघाची शिकार केल्याची कबुली दिल्याची माहिती आहे. 

आज सकाळी या आरोपींना त्यांच्या घरी नेण्यात आले. पंचासमोर आरोपींची घरांची झडती घेतली असता घराच्या मागील बाजूस हाडे लपविण्यात आल्याचे उघड झाले. दरम्यान, एका डब्यात वाघनखेही आढळली. त्यानंतर आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले.

विदर्भ

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - वाढत्या तापमानामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे चित्र होते.  परंतु, बदलत्या वातावरणातही स्वाइन फ्लूचा...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पदव्युत्तर शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून,...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017