वाघिणीला ठार मारण्याच्या आदेशाला पुन्हा आव्हान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

नागपूर - वाघिणीला नरभक्षक घोषित करून ठार मारण्याचा वादग्रस्त आदेशाला पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान केले आहे. या प्रकरणी बुधवारी (ता. ११) न्यायमूर्तिद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.

ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील वाघिणीने गावकऱ्यांवर हल्ले केल्यामुळे ठार मारण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाला आव्हान देणारी जनहित याचिका डॉ. जेरील बनाईत यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. यावर न्यायालयाच्या आदेशानुसार वाघिणीला जेरबंद करून गोरेवाडा केंद्रात आणले. तेथून पुढे नागपूर व अमरावती वनक्षेत्रात सोडले. मात्र, तिथेदेखील वाघिणीने हैदोस घातल्यामुळे दुसऱ्यांदा ठार मारण्याचा आदेश दिला. त्या आदेशाला नव्याने आव्हान दिले. मात्र, आदेशाची वैधता सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे वनविभागाने आदेश मागे घेतले. यानंतर चार दिवसांचा काळ लोटत नाही तोच ठार मारण्याचा नव्याने आदेश दिला आहे. या आदेशाला पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. यानुसार याचिकाकर्त्याने दिवाणी अर्ज जोडला आहे. या प्रकरणी याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. तुषार मंडलेकर कामकाज पाहत असून, त्यांना ॲड. रोहन मालवीय सहकार्य करीत आहेत.

Web Title: nagpur vidarbha news tiger death order