बंदिस्त वाघीण घेणार मुक्त श्‍वास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

नागपूर - वडसा वनविभागातून बंदिस्त करून गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये सध्या मुक्कामी असलेल्या वाघिणीची मुक्तता करण्याचा समितीच्या सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला आहे. झिरो माईल्स येथील अप्पर प्रधान मुख्य 

वनसंरक्षक(वन्यजीव) यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान ही वाघीण नरभक्षक नसल्याचा खुलासाही केला आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील देसाईगंज, आरमोरी तालुक्‍यातील अनेक गावे आणि जंगलाच्या सीमेवर वाघिणीने अनेक पाळीव जनावरांची शिकार केली. तसेच वाघिणीच्या हल्ल्यात दोन जणांचे जीव गेल्याने गावकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी वाघिणीला जेरबंद करण्याच्या सूचना केली होती. त्यानुसार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी वाघिणीला बेशुद्ध करून बंदीस्त केले होते. त्यानंतर तिला गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे. या वाघिणीला आता मानवी सहवासासह इतरही वन्यप्राणी सहवासापासून दूर ठेवले आहे.

वाघिणीला लवकर सोडण्यात येणार आहे. त्या वाघिणीची प्रकृती उत्तम असून तीला मुक्त करण्यासाठी समितीने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) ए. के. मिश्रा या वाघिणीची सुटका करण्याचा निर्णय घेणार आहे. आता जागा निश्‍चिती आणि सोडण्याचा कालावधी लवकरच निश्‍चित केला जाणार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. बैठकीला समितीचे सदस्य नागपूर पशुवैद्याकीय महाविद्यालयाचे सेवानिवृत्त अधिष्ठाता डॉ. एन. पी. दक्षिणकर, सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. जी. खोलकुटे, सातपुडा फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर रिठे, विभागीय वनाधिकारी गिरीश वशिष्ठ, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते उपस्थित होते. तसेच गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे विभागीय वनाधिकारी नंदकिशोर काळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद धुत, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफर क्षेत्राचे अधिकारी उपस्थित होते.