फ्रेंचचे शिष्टमंडळ आज शहरात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

स्मार्ट नागपूरची करणार पाहणी - विविध प्रकल्पांना देणार भेट
नागपूर - ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमांतर्गत तीस सदस्यांचे फ्रेंच शिष्टमंडळ उद्या गुरुवारी (ता. २२)  शहरात येत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांसोबतच विविध प्रकल्पांची माहिती शिष्टमंडळ जाणून घेईल. चंदीगड, पाँडीचेरी आणि नागपूर या तीनच शहरांना हे शिष्टमंडळ भेट देणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सला दिलेल्या भेटीदरम्यान भारतातील तीन शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. याअंतर्गत फ्रेंच सरकारची आर्थिक संस्था असलेली फ्रेंच डेव्हलमेंट एजन्सी (AFD) जगभरातील सार्वजनिक वित्तीय आस्थापनांना कर्जपुरवठा करते. याच एजन्सीने नागपूर मेट्रो प्रकल्प आणि नागपूर स्मार्ट सिटी उपक्रमाला अंशत: कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्समधील दौऱ्यादरम्यान फ्रेंच डेव्हलमेंट एजन्सीच्या माध्यमातून एक बिलियन युरो स्मार्ट सिटी प्रकल्पाला देण्याची घोषणा फ्रेंच अध्यक्षांनी केली होती. 

स्मार्ट सिटी उपक्रमातील सहयोग पुढे सुरू ठेवण्याच्या दृष्टीने फ्रान्स सरकारच्या द्विपक्षीय आर्थिक संबंधाचे विशेष प्रतिनिधी पॉल अर्मलीन फ्रान्समधील टॉप कंपनीच्या प्रमुखांचा सहभाग असलेल्या सदस्यीय प्रतिनिधी मंडळासह भारतात येत आहेत. गुरुवारी ते नागपूर भेटीवर असून स्मार्ट सिटी, नागरी विकास आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत या क्षेत्रात इंडो-फ्रेंच संबंध अधिक दृढ करण्याचा त्यांचा उद्देश आहे.

या भेटीदरम्यान पॉल अर्मलीन महापौर आणि आयुक्तांची भेट घेतली. दिवसभरात सदर शिष्टमंडळ महामेट्रो अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या इलेक्‍ट्रिक कार सुविधा, नागनदी स्वच्छता अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमाच्या जागेला प्रत्यक्ष भेट देतील. त्यानंतर स्मार्ट सिटी उपक्रमाचे सादरीकरण नागपूर महापालिकेतर्फे करण्यात येईल.