पेंचची पर्यटक संख्या घटली

राजेश रामपूरकर
रविवार, 13 ऑगस्ट 2017

महसुलात वाढ - जिप्सीची सक्ती, प्रवेशशुल्क वाढीचा फटका 

नागपूर - पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांनी जिप्सीची सक्ती, प्रवेशशुल्कात वाढ केल्याने यंदा पर्यटकांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत कमालीची घट झाली आहे. महसुलात दुपटीने वाढ झालेली असली, तरी सामान्य नागरिकांनी या व्याघ्रप्रकल्पाकडे पाठ दाखविल्याची चर्चा आहे.

महसुलात वाढ - जिप्सीची सक्ती, प्रवेशशुल्क वाढीचा फटका 

नागपूर - पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांनी जिप्सीची सक्ती, प्रवेशशुल्कात वाढ केल्याने यंदा पर्यटकांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत कमालीची घट झाली आहे. महसुलात दुपटीने वाढ झालेली असली, तरी सामान्य नागरिकांनी या व्याघ्रप्रकल्पाकडे पाठ दाखविल्याची चर्चा आहे.

हमखास व्याघ्रदर्शनासाठी ताडोबापाठोपाठ आता पेंच व्याघ्रप्रकल्पाचा क्रमांक लागतो आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढत असताना तत्कालीन क्षेत्र संचालकांनी पेंच व्याघप्रकल्पात भ्रमंती करण्यासाठी जिप्सीची सक्ती आणि प्रवेशशुल्कात भरमसाट वाढ केली होती. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने पर्यटकांनी आपल्या वनभ्रमंतीचे नियोजन रद्द केले. पेंच व्याघ्रप्रकल्पात २०१४-१५ या आर्थिक वर्षात ३९ हजार ३३०, २०१५-१६ मध्ये ५६ हजार ४२२,  २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३३ हजार ९०२ पर्यटकांनी हजेरी लावली. टप्प्याटप्प्याने पर्यटकांची संख्या वाढणाऱ्या या प्रकल्पाला यंदा मात्र फक्त ३४ हजार पर्यटकांनी भेट दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या तब्बल २२ हजार ५२० घटली आहे. 

पेंच व्याघ्रप्रकल्पात पूर्वी खासगी वाहनाने पर्यटनाला परवानगी होती. तसेच प्रवेशशुल्कही कमी होते. मात्र, गेल्या वर्षी स्थानिकांना रोजगार मिळावा आणि वनाच्या संवर्धनामध्ये पर्यटकांचा हातभार लागावा म्हणून पेंच व्याघ्र फाउंडेशनच्या सदस्यांनी वनभ्रमंतीसाठी जिप्सी सक्तीची करण्याचा निर्णय घेतला. पर्यटनशुल्कही वाढविले. त्याचा फटका पर्यटकांना बसल्याचे एका अधिकाऱ्यांनी मान्य केले. यामुळे हे पर्यटन सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले असून, नियमित भेटी देणाऱ्या वन्यजीवप्रेमींनीही खिशाला परवडत नसल्याने या व्याघ्रप्रकल्पातील पर्यटनाला कात्री लावली आहे. 

२०१५-१६ या वर्षात ५६ हजार ४२२ पर्यटकांनी भेट दिल्या असून, ७० लाख ९२ हजारांचा महसूल मिळाला होता. २०१६-१७ या वर्षात ३३ हजार ९०२ पर्यटकांनी भेट दिली असली, तरी १ कोटी ४० लाख ९५ हजारांचा महसूल मिळाला आहे. महसुलात वाढ झालेली असताना मात्र पर्यटकांची संख्या ४० टक्‍क्‍यांनी घटली आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षात ३९ हजार ३३० पर्यटकांनी भेट दिल्याने ५८ लाख ६७ हजारांचा महसूल मिळाला होता. दरवर्षी पर्यटनशुल्कात वाढ होत असल्याने पर्यटकांची संख्या रोडावू लागली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

जिप्सीची सक्ती, प्रवेशशुल्कात वाढ केल्यामुळे पर्यटकांची संख्या कमी झाली. सामान्य पर्यटक वनपर्यटनाला मुकला आहे. यावरून श्रीमंतांनीच जंगल पर्यटन करावे आणि सामान्यांनी फक्त चित्रातच वन्यप्राणी पाहायचे का, असा सवालही उपस्थित केला. 
- विनीत अरोरा, पर्यटक

विदर्भ

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - वाढत्या तापमानामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे चित्र होते.  परंतु, बदलत्या वातावरणातही स्वाइन फ्लूचा...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पदव्युत्तर शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून,...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017