बेरोजगार तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बेरोजगार तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर - अधिवेशनात लाखो युवकांना रोजगार दिल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत असतानाच एका युवकाने विधानभवनाच्या बाहेर झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. 

पोलिसांनी झाडावर चढून त्यास खाली उतरवून ताब्यात घेतले. नांदेड जिल्ह्यातील धानोरा येथील सुनील भुजंग पाटील याने बेरोजगारीला कंटाळून पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. सुनील दुपारच्या सुमारास महानगरपालिकेजवळ आला. रस्त्याच्या कडेच्या झाडावर चढला. तो तेथून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता. काही लोकांचे लक्ष त्याच्याकडे गेले. लागलीच पोलिसांना याची माहिती मिळाली. विधानभवनाच्या सुरक्षेत असलेले पोलिस तिथे दाखल झाले. त्यांनी त्यास खाली उतरवले. सदर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com