जलवाहिनी फुटली, हंसापुरीत पूरस्थिती

हंसापुरी - फुटलेल्या जलवाहिनीतून उडणारा पाण्याचा फवारा. त्यामुळे परिसरात साचलेले तळे.
हंसापुरी - फुटलेल्या जलवाहिनीतून उडणारा पाण्याचा फवारा. त्यामुळे परिसरात साचलेले तळे.

नागपूर - हंसापुरीतील बोरियापुरा जलकुंभाला पाणीपुरवठा करणारी सातशे मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी आज सकाळी फुटली. पाण्याचा वेग मोठा असल्याने काही वेळातच परिसरातील मैदानात तळे साचले. काही नागरिकांच्या घरांमध्येही पाणी शिरले. त्यामुळे हंसापुरीत खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच ओसीडब्ल्यूचे कर्मचारी आणि तज्ज्ञ पोहोचले.

बोरियापुरा येथील जलकुंभाला सातशे मीटर व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जातो. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास जलकुंभाला पाणीपुरवठा करणारी ही जलवाहिनी अचानक फुटली. बोरियापुरा येथील जलकुंभाची क्षमता २२.७० लाख लिटरची आहे. या जलकुंभाला जोडणारी जलवाहिनी फुटताच जलकुंभातील पाणीही वेगाने खाली आले. त्यामुळे या ठिकाणी बारा फूट उंच फवारा उडाला. बराच वेळ हा फवारा उडत होता. या फवाऱ्याच्या बाजूनेच चारचाकी वाहनेही उभी होती. या वाहनांतही पाणी शिरले. काही वेळातच या परिसरात तळे साचले. काही नागरिकांच्या घरांमध्येही पाणी शिरले. या घटनेची माहिती तत्काळ ओसीडब्ल्यू व जलप्रदाय विभागाचे अधीक्षक अभियंता संजय गायकवाड यांना देण्यात आली. ओसीडब्ल्यूचे कर्मचारी व तज्ज्ञ तत्काळ ओसीडब्ल्यूचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय रॉय व संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात घटनास्थळी पोहोचले. या कर्मचारी व तज्ज्ञांनी तत्काळ जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र, या घटनेमुळे हंसापुरी, खदान, ज्योतीनगर, गांजाखेत, गोळीबार चौक, टिमकी तीन खंबा चौक परिसरातील घरांना आज पाणीपुरवठा होऊ शकला नाही. उद्यापासून या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे ओसीडब्ल्यूने स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com