आता घरपोच मिळतील रोपटी - मुख्य वनसंरक्षक भगवान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

नागपूर - वनविभागाद्वारे २५ जूनपासून ‘रोपे आपल्या दारी’ योजना राबविण्यात येणार आहे. यामुळे विविध संस्था, नागरिकांना सहज रोपे उपलब्ध होतील. वृक्षलागवडीच्या कार्यक्रमात नागरिकांनी हिरिरीने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्री. भगवान यांनी आज केले.  

नागपूर वनविभागाद्वारे तयार केलेल्या प्रचार प्रसिद्धी वृक्षरथाला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्यालयात हिरवी झेंडी दाखविल्यानंतर ते बोलत होते. 

यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व्यवस्थापन) एन. पी. खवारे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव, डॉ. दिलीप सिंह, अनिल काकोडकर, शैलेश टेंभुर्णीकर, आर. एस. यादव, जी. साईप्रकाश, जी. मल्लिकार्जुन, सहायक प्रसिद्धी व माहिती अधिकारी (वने) सुभाष डोंगरे, सहायक वनसंरक्षक विनायक उमाळे उपस्थित होते. 

भगवान म्हणाले, चार कोटी वृक्ष लागवडीपैकी वनविभाग २ कोटी २५ लाख वृक्षांची लागवड करणार आहे. या चित्ररथामुळे समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांपर्यंत रोपटी कशी लावावी, ती कशी जगवावी, याबाबत माहिती देण्यात येईल. वृक्षरथ नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया वनविभागातील सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये व जनतेला सहभागी होण्याकरिता या रथांच्या माध्यमातून प्रचार करणार आहे. 

वृक्ष लागवडीची प्राथमिक तयारी पूर्ण झालेली आहे. त्या कार्याची जागृती जनमानसात व्हावी या दृष्टीने नागपूर विभागाने त्यांच्याकडील संरक्षण वाहनांना वृक्षरथाचे स्वरूप देऊन, त्यांचा वापर जनजागृतीकरिता करण्याचा निर्धार केला. त्या रथावर जनजागृतीच्या उद्देशाने सुविचार, म्हणी, शुभसंदेश, छायाचित्र, ऑडिओ, व्हिडिओ स्वरूपात पर्यावरण संदेश लिहिण्यात आले आहेत.

विदर्भ

नागपूर - बडोदा येथे होणाऱ्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...

02.30 AM

नागपूर - कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व कॉंग्रेस प्रभारी मोहन प्रकाश यांना हटविण्याची मागणी करण्यासाठी नागपुरातील...

12.30 AM

वर्धा : आष्टी तालुक्यातील वडाळा येथील शेतकरी शेतातून बैल घरी परत आणत असताना एका वाघिणीने हल्ला चढवला. या हल्ल्यात बैल पळून...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017