साउंड रेकॉर्डिंग क्षेत्रातील अग्रणी चारुदत्त जिचकार

हजारो कलाकृतींना दिले तंत्रातून बळ; अनेक कलावंतांसाठी काम
चारुदत्त जिचकार
चारुदत्त जिचकारsakal

नागपूर : कला क्षेत्रात प्रत्येकाला ग्लॅमर प्राप्त होईल, असे नाही. प्रकाशझोतात राहणाऱ्यांना ग्लॅमर जरूर मिळते. मात्र, त्याला उभे करण्यामागे अनेकांचे हात असतात. यातील एक म्हणजे साउंड एडिटर. शहरातील चारुदत्त जिचकार यापैकी एक असून कलावंतांसह संगीत क्षेत्रातील अनेकांच्या नावापुढे त्यांनी आपल्या तंत्रकुशल कामासह चारचांद लावले.गेल्या तेवीस वर्षांपासून चारुदत्त ‘मधुरिका ऑडिओ एड रेकॉर्डिंग स्टुडिओ’च्या माध्यमातून अभिनेता, गायक, संगीतकार, संगीत संयोजक, दिग्दर्शक, निर्माते यांच्या मेहनतीला साउंड एडिटिंगच्या माध्यमातून बळ देत आहेत. त्यांनी केलेल्या कामाची संख्येत मोजणी करता येणार नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात आवाजाच्या क्षेत्रात त्यांचे काम आहे. विशेष म्हणजे, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कुशलतेने काम करीत असूनही मुंबई, पुणे न गाठता जन्मभूमी नागपूरशी त्यांनी नाळ जुळून ठेवली आणि शहरातील कलावंतांना प्रोत्साहन दिले.

चारुदत्त जिचकार
व्यापार क्षेत्र ‘व्हेंटिलेटर’वर; बाधित वाढल्याने लग्नसराईचा व्यवसाय बुडाला

त्यांच्या आई सुमन संगीतात विशारद तर बहीणसुद्धा गायिका. बालपणापासूनच त्यांच्या घरात कलेचे वातावरण होते. वडील प्रल्हादराव जिचकार कृषी विभागात फलोत्पादन उपसंचालक म्हणून निवृत्त झाले. त्यांनी चारुदत्त यांना प्रोत्साहन म्हणून व घरातील गायकांना वाद्यावर साथ द्यायला वादक हवा म्हणून चारुदत्त यांना तबल्याचे शिक्षण घ्यायला लावले. तबला म्हणजे प्रत्येक तालवाद्याचा पाया. याच तबल्याचे शिक्षण त्यांनी बाबूराव भरणे याच्याकडून घेतले. छोट्या मोठ्या कार्यक्रमांमधून वाद्याचे सादरीकरण करता करता त्यांनी बी. कॉम, एमएसडब्लूपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

चारुदत्त जिचकार
नागपूर : एसटी संपामुळे ४० टक्के व्यवसाय बुडाला

दरम्यान अद्वैत कल्चरल ऑर्गनायझेशन, स्वर सुमनांजली अशा विविध समूहातून रंगमंचावर त्यांनी एंट्री घेतली. याच काळात रेकॉर्डीस्ट बडू पदम यांचे काम पाहून त्यांना आवाजाच्या क्षेत्रातील तंत्रज्ञानाची गोडी लागली. पाच वर्षे निरीक्षण करून त्यांनी ज्ञान घेतले आणि याच क्षेत्राला आपले करिअर म्हणून निवडायचा निर्णय घेतला. अभिनव क्षेत्रातील पायाभूत ज्ञान मिळावे म्हणून नाट्यशात्रातील ‘मास्टर ऑफ फाइन आर्ट’ अभ्यासक्रम त्यांनी २०१७ साली पूर्ण केला.

केवळ तंत्रज्ञ म्हणून ते काम करीत नसून संगीत क्षेत्रातील भक्कम अनुभव पाठीशी ठेवत त्यांनी हा डोलारा उभा केला.कारकिर्दीमध्ये कंपोजर मोरेश्‍वर निस्ताने आणि वीरेंद्र लाटकर यांचे त्यांना सहकार्य लाभले. लॉकडाऊनमध्ये गरजू कलावंतांना पाच हजार धान्याच्या किटचे त्यांनी वाटपसुद्धा केले.

चारुदत्त जिचकार
संपामुळे नागपूर जिल्ह्यातील ४० टक्के व्यवसाय बुडाला

ऑलराउंडर चारुदत्त

आज चित्रपट, मालिका, नाटक, महानाट्य, जाहिरात, शाळा महाविद्यालयांचे स्नेहमिलन सोहळे अशी प्रत्येक कलाकृतीसाठी उभी करण्यासाठी ते झटत आहेत. या कलाकृतींचे ऑडिओ रेकॉर्डिंग, वोकल डबिंग, गीत रचणे, संगीत देणे आदी कामे ते शिताफीने करतात. सुरेश वाडकर, अजित कडकडे, रवींद्र साठे, सुधीर दळवी, देवेंद्र दोडके आदी कलावंतांसाठी त्यांनी काम केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com